Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार

इटालियन बाईकचे प्रोडक्शन चक्क महाराष्ट्रातील बारामतीमध्ये होणार! मोटोजीझीची नवीन Trip 500 ही बाईक एप्रिलिया RS 457 चे 457cc इंजिन वापरते. पण भारतात तिची विक्री होणार का, याबाबत अजून उत्सुकता कायम आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 31, 2026 | 08:47 PM
महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार
Follow Us
Follow Us:
  • मोटोजीझी Trip 500 चे प्रोडक्शन महाराष्ट्रातील बारामती येथील पियाजिओ प्लांटमध्ये केले जाणार आहे.
  • या बाईकमध्ये 457cc पॅरलल-ट्विन इंजिन असून जवळपास 48 hp पॉवर मिळते.
  • 3 रायडिंग मोड्स, 3.6-इंच TFT डिस्प्ले आणि 15 लिटर फ्युल टँक ही वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी एक खास बातमी समोर आली आहे. इटलीची प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी मोटोजीझीनी आपली नवीन मिडलवेट रोडस्टर बाईक Trip 500 सादर केली आहे. विशेष म्हणजे, या बाईकचे प्रोडक्शन महाराष्ट्रातील बारामती येथील पियाजिओच्या प्लांटमध्ये केले जाणार आहे. याच प्लांटमध्ये एप्रिलिया RS 457 आणि Tuono 457 या बाईक्स तयार केल्या जातात. युरोपमध्ये या बाईकची विक्री 2027 च्या सुरुवातीला सुरू होणार असून, 3 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मिलानमधील EICMA 2026 प्रदर्शनात ती पाहायला मिळणार आहे.

मोटोजीझी Trip 500 मध्ये एप्रिलिया RS 457 आणि Tuono 457 मध्ये वापरण्यात येणारे 457cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जवळपास 48 hp पॉवर जनरेट करते. एप्रिलिया RS 457 मध्ये हेच इंजिन 47.6 hp पॉवर आणि 43.5 Nm टॉर्क देते. पण Trip 500 मध्ये कमी RPM वर सहज टॉर्क मिळण्याच्या दृष्टीने इंजिनचे ट्युनिंग करण्यात आले आहे. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. युरोपमधील A2 लायसन्सच्या नियमांनुसारही या बाईकची पॉवर ठेवण्यात आली आहे.
Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता

डिझाइनच्या बाबतीत कंपनीने आपल्या पारंपरिक ट्रान्सव्हर्स V-Twin इंजिनपासून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. या बाईकमध्ये गोल LED हेडलॅम्प, मेटल फ्युल टँक, ब्लॅक फिनिश इंजिन आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हेडलॅम्पवर कंपनीचे ईगल चिन्ह दिसते, तर सीटवर The Trip अशी खास एम्ब्रॉयडरी आहे. फ्युल टँकची कॅपसिटी 15 लिटर आहे.

या रोडस्टरचे वजन 180 किलो असून सीट हाइट 790mm आहे. टेक्नोलॉजीच्या बाबतीत Ride-by-Wire थ्रॉटल, Road, Sport आणि Rain असे 3 रायडिंग मोड्स मिळतात. यामध्ये 3.6-इंच गोल TFT डिस्प्ले असून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि पिक्टोग्राम नेव्हिगेशनची सुविधाही आहे. क्विकशिफ्टरचे फीचर अ‍ॅक्सेसरी म्हणून मिळणार आहे. याशिवाय बॅकलिट स्विचगियर आणि फुल LED लाइटिंग देण्यात आली आहे.

मोटोजीझी Trip 500 Black Metropolis, Green Grove आणि Red Beat अशा 3 रंगांमध्ये विकली जाणार आहे. The Opening नावाची खास एडिशनही सादर केली जाणार आहे. या बाईकचे प्रोडक्शन महाराष्ट्रात होणार असले तरी भारतात विक्रीसाठी ती आणली जाणार का, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतीय बाईकप्रेमींचे लक्ष आता कंपनीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

नवी टोयोटा फॉर्च्युनरचा डिसेंबरमध्ये होणार ग्लोबल प्रीमियर! या दमदार SUV च्या नव्या अवताराची उत्सुकता वाढली

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: Moto Guzzi Trip 500 चे प्रोडक्शन कुठे होणार आहे?

उत्तर: या बाईकचे प्रोडक्शन महाराष्ट्रातील बारामती येथील पियाजिओच्या प्लांटमध्ये केले जाणार आहे.

प्रश्न 2: Moto Guzzi Trip 500 मध्ये कोणते इंजिन मिळते?

उत्तर: या बाईकमध्ये 457cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन जवळपास 48 hp पॉवर जनरेट करते आणि त्यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.

प्रश्न 3: Moto Guzzi Trip 500 भारतात लाँच होणार आहे का?

उत्तर: सध्या भारतातील लाँचबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बाईकची युरोपमधील विक्री 2027 च्या सुरुवातीला सुरू होणार आहे.

Web Title: Moto guzzi trip 500 india made aprilia 457 engine auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • maharashtra

संबंधित बातम्या

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे नवीन मॉडेल लाँच! मोठी स्क्रीन, पॅनोरॅमिक कॅमेरा आणि हायटेक फीचर्स
1

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचे नवीन मॉडेल लाँच! मोठी स्क्रीन, पॅनोरॅमिक कॅमेरा आणि हायटेक फीचर्स

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 च्या 125th Anniversary Edition ला जबरदस्त प्रतिसाद! अवघ्या 6 मिनिटांत सर्व बाईक्स सोल्ड आउट
2

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 च्या 125th Anniversary Edition ला जबरदस्त प्रतिसाद! अवघ्या 6 मिनिटांत सर्व बाईक्स सोल्ड आउट

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई
3

Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्याला यश! आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट
4

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.