फोटो सौजन्य: Social Media
सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. आता ह्युंदाई कंपनी सुद्धा इलेक्ट्रिक कार आणायच्या तयारीत आहे.
दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी ह्युंदाईने भारतात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनीने मार्केटमध्ये Creta मध्यम आकाराची SUV म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी लवकरच त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे. यामुळे एसयूव्हीत कोणते फिचर्स आहेत याची माहिती मिळाली आहे.
हे देखील वाचा: Electric Car विकत घेण्याअगोदर करा ‘ही’ कामं, न केल्यास होईल पश्चाताप
Hyundai Creta EV लाँच होण्यापूर्वी तिची टेस्टिंग केली जात आहे. भारतात वेगवेगळ्या परिस्थितीत त्याची टेस्टिंग केली जात आहे. ही कार पुढे अपडेट देखील केली जाईल. टेस्टिंग दरम्यान या कारच्या फ्रंट लुकची माहिती मिळाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, SUV च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला ICE व्हर्जनच्या तुलनेत वेगळा फ्रंट दिला जाईल. यामध्ये फ्रंट ग्रीलऐवजी ब्लँक ऑफ ग्रिल वापरण्यात येणार आहे. यासोबतच आघाडीत आणखी काही बदल केले जाऊ शकतात. चार्जिंग पोर्टसाठी कारच्या पुढील भागात जागा दिली जाईल. रियर प्रोफाइलमध्ये किरकोळ बदल देखील केले जाऊ शकतात.
हे देखील वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ही’ 7 सीटर कार ठरत आहे सुपरहिट, किंमत फक्त 6 लाख
रिपोर्ट्सनुसार, यात 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल कन्सोलमधील बटण पॅनल, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर यांसारख्या फीचर्ससह प्रदान केले जाईल
चालकाच्या सुरक्षेसाठी, SUV मध्ये ADAS, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट, ESP आणि सहा एअरबॅग्ज सारख्या फीचर्सचा समावेश असेल.
कंपनीकडून या कारमध्ये बॅटरीचे दोन पर्याय दिले जाऊ शकतात. ज्यामध्ये 50kWh आणि 60 kWh क्षमतेच्या बॅटरी दिल्या जाऊ शकतात. यामुळे एसयूव्हीला फुल्ल चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते.
कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटीमध्ये ही इलेक्ट्रिक कार सादर केली जाईल आणि पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत डिलिव्हरी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
Hyundai च्या या मास सेगमेंट इलेक्ट्रिक SUV ची नेमकी किंमत त्याच्या लाँचच्या वेळीच कळेल. परंतु अंदाजे 20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीच्या आसपास ही कार लाँच केले जाईल.