जसजसे दिवस सरत आहेत तसतसे इलेक्ट्रिक कार्सची मागणी जोर धरू लागत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. ग्राहक सुद्धा वाढत्या पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजीच्या किंमतीमुळे त्रस्त होऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळत आहे. सध्या दिवाळी सुद्धा तोंडावर आहे. अशावेळी जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण इलेक्ट्रिक कार विकत घेण्याअगोदर कोणती कामं करणे जरुरीचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक कारचे मालक होण्याअगोदर करून घ्या ही कामं (फोटो सौजन्य: iStock)
सध्या देशभरात इलेक्ट्रिक कार्सचे जोरदार वारे वाहत आहे. प्रत्येक ऑटो कंपनीज आपली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लाँच करत आहे. चला जाणून घेऊया ईव्ही घेण्याआधी कोणती कामं करणे जरुरीचे आहे.
बजेट तयार करा: इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याआधी तुमचा बजेट सेट करून ठेवा. कार खरेदी करताना तुम्ही किती रुपयांचे Down Payment करून मासिक हप्ता भरणार आहात हे निश्चित करून घ्या.
आवडता मॉडेल निवडा: कारचे बजेट सेट करून झाल्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार एक योग्य कार निवडा. तुम्हाला आरामदायी इलेक्ट्रिक कार हवी असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक सेडान खरेदी करू शकता.
कारची रेंज चेक करा: तुमच्या बजेटमधील सर्वोत्तम रेंज आणि फीचर्ससह सुसज्ज असलेली इलेक्ट्रिक कार निवडा. यावेळी रेंजबद्दल दिलेले आकडे योग्य आहे का याची खात्री करून घ्या.
चार्जिंग स्टेशन शोधा: इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यापेक्षा तिच्यासाठी चांगले चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करणे अधिक कठीण आहे. जर तुमच्या घराजवळ चार्जिंग स्टेशन असेल तर चांगले पण जर नसेल तर तुम्हाला जवळपास चार्जिंग स्टेशन शोधावे लागेल.