Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta Vs New Kia Seltos 2026: फीचर्स, पॉवर आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे?

नुकतेच किआ मोटर्सने Kia Seltos चा नवीन जनरेशन सादर केला होता. ही एसयूव्ही थेट ह्युंदाई क्रेटासोबत स्पर्धा करणार आहे. चला या दोन्ही कार्सच्या फीचर्स, पॉवर आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 23, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन किया सेल्टोस 2026 सादर
  • थेट Hyundai Creta सोबत लढत
  • कोणती कार बेस्ट? जाणून घ्या
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार ऑफर होत असतात. यात सर्वाधिक मागणी ही SUV सेगमेंटमधील वाहनांना मिळताना दिसते. याच सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यातीलच दोन नावं म्हणजे Kia Seltos आणि Hyundai Creta.

नुकतेच किया सेल्टोसचे नवीन जनरेशन कंपनीने सादर केले आहे. जी आता जास्त मोठी, अधिक आधुनिक आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम रूपात दिसणार आहे. दरम्यान, ह्युंदाई क्रेटा ही तिच्या सेगमेंटमध्ये आधीच सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. त्यामुळे, लोकांच्या मनात प्रश्न आहे की नवीन सेल्टोस चांगली आहे की क्रेटा अजूनही सर्वोच्च दर्जाची आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

किमतीत कोणाचा पगडा भारी?

नवीन किआ सेल्टोस 2026 ची किंमत 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाईल. 25000 रुपयांच्या टोकन रकमेसाठी बुकिंग आधीच सुरू झाले आहे. असा अंदाज आहे की सुरुवातीची किंमत सुमारे 11.20 लाख असू शकते. तर दुसरीकडे, ह्युंदाई क्रेटाची किंमत 10.73 लाखांपासून सुरू होते आणि 20.20 लाखांपर्यंत जाते. क्रेटा थोडी स्वस्त असू शकते, जी बजेटच्या बाबतीत ग्राहकांना आकर्षित करते.

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

साइझ आणि स्पेसमध्ये कोणाचे वर्चस्व?

नवीन जनरेशनची किआ सेल्टोस पूर्वीपेक्षा लांब आणि रुंद आहे. याचा व्हीलबेस देखील लांब आहे, ज्यामुळे मागच्या प्रवाशांना जास्त लेगरूम मिळतो. बूट स्पेसमध्ये देखील सुधारणा झाली आहे, ज्यामुळे लांब प्रवासात सामान ठेवणे सोपे झाले आहे. जागेच्या बाबतीतही ह्युंदाई क्रेटा एक चांगली एसयूव्ही आहे, परंतु आकाराच्या बाबतीत नवीन सेल्टोस थोडीशी मागे पडते.

इंजिन आणि परफॉर्मन्सची स्थिती

इंजिन पर्यायांच्या बाबतीत दोन्ही SUVs जवळपास सारख्याच आहेत. पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पॉवर आणि परफॉर्मन्समध्ये फारसा फरक जाणवत नाही. मात्र New Kia Seltos 2026 मध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसोबत नवीन क्लचलेस मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो Creta मध्ये उपलब्ध नाही. तर स्पोर्टी ड्रायव्हिंग पसंत करणाऱ्यांसाठी Creta N Line मध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय दिला जातो.

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

फीचर्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये कोण आघाडीवर?

फीचर्सच्या बाबतीत दोन्ही SUVs अत्याधुनिक आहेत. New Kia Seltos 2026 मध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि हेड-अप डिस्प्ले मिळतो, ज्यामुळे ती अधिक खास ठरते. यामध्ये 10-वे पॉवर अ‍ॅडजस्ट ड्रायव्हर सीट आणि मेमरी फंक्शनही देण्यात आले आहे. Hyundai Creta मध्ये 8-वे पॉवर सीट उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये पॅनोरमिक सनरूफ, बोस साउंड सिस्टीम आणि लेव्हल-2 ADAS सारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.

कोणती कार खरेदी करावी?

Hyundai Creta आणि New Kia Seltos 2026 या दोन्ही SUVs आपापल्या ठिकाणी मजबूत आणि आकर्षक पर्याय ठरतात. जर तुम्हाला नवीन डिझाइन, अधिक मोठा आकार, जास्त स्पेस आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी हवी असेल, तर New Kia Seltos 2026 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.

दुसरीकडे, विश्वसनीयता, उत्तम परफॉर्मन्स, तुलनेने परवडणारी किंमत आणि मजबूत ब्रँड व्हॅल्यू हवी असल्यास Hyundai Creta अजूनही एक सुरक्षित आणि उत्तम निवड आहे.

Web Title: Hyundai creta vs new kia seltos 2026 which suv is perfect in features price performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

‘ही’ आहे Royal Enfield ची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, 1 लिटर पेट्रोलवर देते 41 किमीचा मायलेज
1

‘ही’ आहे Royal Enfield ची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, 1 लिटर पेट्रोलवर देते 41 किमीचा मायलेज

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती
2

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

Tata Sierra EV व्हर्जनची टेस्टिंग सुरु, फीचर्सपासून किमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
3

Tata Sierra EV व्हर्जनची टेस्टिंग सुरु, फीचर्सपासून किमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
4

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.