फोटो सौजन्य: Pinterest
भारतात अनेक वर्षांपासून KTM ने दमदार बाईक्स ऑफर केल्या आहेत. तरुणांमध्ये तर कंपनीच्या बाईक विशेष लोकप्रिय आहेत. आता केटीएम भारतात त्यांच्या ॲडव्हेंचर बाईक लाइनअपचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात KTM 390 Adventure R लाँच करणार आहे. ही बाईक अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे ज्यांना 390 Adventure पेक्षा अधिक ऑफ-रोड क्षमता आणि अधिक हार्डकोर सेटअप हवा आहे. या केटीएम बाईकमध्ये कोणते खास फीचर्स असतील त्याबद्दल जाणून घेऊयात.
Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर
KTM 390 Adventure R मध्ये कंपनीचे 399cc, सिंगल-सिलेंडर LC4c इंजिन आहे. हे इंजिन 45.2 hp आणि 39 Nm टॉर्क निर्माण करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लचसह जोडलेले आहे, जे हायवे आणि ऑफ-रोड दोन्हीवर सहज रायडिंगसाठी उपयुक्त आहे. हे तेच पॉवर युनिट आहे जे KTM त्यांच्या मध्यम आकाराच्या परफॉर्मन्स बाईक्समध्ये वापरते.
390 Adventure R ला स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा वेगळे करणारी गोष्ट म्हणजे त्याचे ऑफ-रोड-केंद्रित हार्डवेअर. यात 21-इंच फ्रंट आणि 18-इंच रियर व्हील सेटअप आहे. सस्पेंशन ट्रॅव्हल 230 मिमी (पूर्वी 200 मिमी) आहे. ग्राउंड क्लीयरन्स 272 मिमी असेल आणि सीटची उंची 870 मिमी असेल. हे बदल स्पष्टपणे दर्शवतात की बाईक खडबडीत रस्त्यांवर, पायवाटांवर आणि कठीण ऑफ-रोड परिस्थितीत अधिक उत्तमरीत्या चालेल.
Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
आंतरराष्ट्रीय-स्पेक KTM 390 Adventure R मध्ये हेवी-ड्युटी स्पोक्ड व्हील्स आणि Mitas Enduro Trail E07+ टायर्स दिले जातात. मात्र, भारत-स्पेक मॉडेलला कोणते टायर्स मिळतील, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सस्पेन्शनबाबत बोलायचे झाले तर, फ्रंटला 43 mm WP Apex Open Cartridge फोर्क देण्यात आला आहे, ज्यामध्ये कंप्रेशन आणि रिबाउंड अॅडजस्टमेंटची सुविधा आहे. मागील बाजूस WP Apex स्प्लिट पिस्टन शॉक मिळतो. हा संपूर्ण सस्पेन्शन सेट-अप प्रो-लेव्हल ऑफ-रोड कंट्रोल देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
KTM ने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नसली तरी KTM 390 Adventure R ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ही बाईक लाँच झाल्यानंतर KTM ची 390 Adventure रेंज पूर्ण होईल, ज्यामध्ये 390 Adventure X, स्टँडर्ड 390 Adventure आणि नवीन 390 Adventure R यांचा समावेश असेल.






