
फोटो सौजन्य: Gemini
Hyundai ची सर्वात छोटी SUV असलेल्या Exter वर 98,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. Exter ची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून 9.38 लाख रुपयांपर्यंत आहे.
‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI
Hyundai i20 वर या महिन्यात 95,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध आहे. यामध्ये निवडक पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट्सवर सर्वाधिक फायदा मिळतो. तर i20 N Line वर 87,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. i20 ची एक्स-शोरूम किंमत 6.87 लाख रुपयांपासून 11.53 लाख रुपयांपर्यंत आहे.
Grand i10 Nios वर 89,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.66 लाख रुपयांपासून 7.92 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार Maruti Swift आणि Tata Tiago ला थेट टक्कर देते.
Hyundai Verna च्या टर्बो पेट्रोल आणि नॉन-टर्बो पेट्रोल दोन्ही व्हेरिएंट्सवर 70,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. Verna ची किंमत 10.79 लाख रुपयांपासून 17.13 लाख रुपयांपर्यंत आहे. ही सेडान Honda City, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus यांच्याशी स्पर्धा करते.
2.5 लाखांची सूट देऊन सुद्धा Kawasaki Ninja च्या ‘या’ Bike ची किंमत तब्बल 18.29 लाख रुपये!
Hyundai Alcazar वर एकूण 65,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. या थ्री-रो SUV ची किंमत 14.50 लाख रुपयांपासून 21.06 लाख रुपयांपर्यंत आहे. Alcazar ही Tata Safari, MG Hector आणि Mahindra XUV700 ला टक्कर देते.
वरील वाहनांसोबतच अन्य वाहनांवर सुद्धा डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट ऑफर्स तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकतात.