फोटो सौजन्य: Pinterest
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Hyundai कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर केली आहेत. कंपनी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये ह्युंदाई ऑरा ऑफर करते. जर तुम्ही या सेडानचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती
Hyundai Aura चा बेस व्हेरिएंट म्हणून E व्हेरिएंट ऑफर करते. या सेडानचा बेस व्हेरिएंट 6 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही हा व्हेरिएंट खरेदी केला तर 6 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत रजिस्ट्रेशन आणि इंश्युनरांस चार्जेस समाविष्ट असेल. या कारसाठी अंदाजे 24000 रजिस्ट्रेशन टॅक्स आणि अंदाजे 35000 इंश्युरन्स शुल्क आकारले जाईल. यामुळे या कारची ऑन-रोड किंमत 6.77 लाखांवर पोहोचते.
जर तुम्ही Hyundai Aura चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 5.77 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. बँकेने जर 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.77 लाख रुपये कार लोन दिले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षे दरमहा 9295 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.77 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षे दरमहा 9295 रुपये EMI भरावी लागेल. या कालावधीत तुम्ही Hyundai Aura च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 2.03 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून कारची एकूण किंमत सुमारे 8.80 लाख रुपये इतकी होईल.






