Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai कंपनीची मोठी घोषणा; भारतात उभारणार तब्बल 600 EV चार्जिंग स्टेशन्स

इलेक्ट्रीक वाहन क्षेत्राची अतिशय वेगाने वाढ होत आहे. या क्षेत्राची सर्वात मोठी गरज आहे चार्जिंग स्टेशन. ह्युंदाई कंपनीने भारतात चार्जिंग स्टेशन निर्मितीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. जाणून घेऊया याबद्दल 

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 09:28 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रीक व्हेइकलने क्रांती घडवली आहे. लोकांचाही या  इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे. नोर्वे सारख्या देशात तर इंधनावर आधारित वाहनांपेक्षा इलेक्ट्रीक वाहनांची संख्या जास्त आहे. भारतामध्येही सरकारचे धोरण इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहन क्षेत्र कात टाकत आहे. या इलेक्ट्रीक वाहन क्षेत्राची मोठी गरज आहे चार्जिंग स्टेशन. या सुविधा उभारण्यासाठी अनेक मोठमोठ्या कंपन्या पुढे येत आहे. आता ह्युंदाई कंपनीनेही यासंबंधी मोठे पाऊल उचलले आहे. जाणून घेऊया याबद्दल

Hyundai Motor India  पुढील सात वर्षांत देशभरात जवळपास 600 सार्वजनिक EV फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.कंपनीने सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की डिसेंबर 2024 च्या अखेरीस त्यांच्याकडे 50 जलद सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क असणार आहे.

कार खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Mahindra च्या ‘या’ कारवर तब्बल 3 लाखांची सवलत

प्रमुख शहरांव्यतिरिक्त प्रमुख महामार्गांवर वेगवान ईव्ही चार्जर बसवण्याचा पुढाकार

या घोषणेवर भाष्य करताना, जे वान र्यू, फंक्शन हेड – कॉर्पोरेट प्लॅनिंग, एचएमआयएल यांनी सांगितले की,  2030 पर्यंत त्यांचे ईव्ही मार्केट मजबूतपणे वाढण्याची अपेक्षा आहे.त्यांनी केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या कमतरतेमुळे हायवेवर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ग्राहकांना त्यांची ईव्ही चालवण्याची भीती वाटते. हे लक्षात घेऊन, त्यांनी प्रमुख शहरांव्यतिरिक्त प्रमुख महामार्गांवर वेगवान ईव्ही चार्जर बसवण्याचा पुढाकार घेतला आहे.”इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत अपेक्षित वाढ होण्यासाठी ते पायाभूत सुविधांमध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत असल्याचे जे वान र्यू यांनी सांगितले.आजपर्यंत,

Hyundai Motor India चार्जिंग नेटवर्कने अंदाजे 50,000 चार्जिंग सेशन्स सुलभ केली आहेत, 10,000 हून अधिक Hyundai आणि Non-Hyundai EV ग्राहकांना 7.30 लाख युनिट्सपेक्षा जास्त ऊर्जा वितरित केली आहे.

प्रमुख शहरांसहित महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्स

ह्युंदाई ईव्ही चार्जिंग स्टेशन मुंबई, गुरुग्राम, पुणे, बेंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद आणि चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थित आहेत. कंपनीने दिल्ली-चंदीगड, दिल्ली-जयपूर, हैदराबाद-विजयवाडा, मुंबई-पुणे, मुंबई-सुरत, बेंगळुरू-पुणे आणि पुणे-कोल्हापूर या प्रमुख महामार्गांवर चार्जिंग स्टेशन्स उभारून संपूर्ण भारत नेटवर्क देखील स्थापित केले आहे. myHyundai ॲप वापरकर्त्यांना ‘EV चार्ज’ वैशिष्ट्यासह सक्षम करते, देशभरातील 10,000 हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्समध्ये प्रवेश प्रदान करते.

TVS Ronin च्या नवीन एडीशनचे अनावरण; नवीन अपडेट्समुळे बाईक बनली अधिक आकर्षक

तमिळनाडू सरकारबरोबर सामंजस्य करार

ह्युंदाईने 2027 पर्यंत  100 EV चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तमिळनाडू सरकारसोबत सामंजस्य करारही केला आहे. त्यापैकी 10 स्टेशन्स यावर्षी कार्यान्वित होतील.तमिळनाडूमधील सर्व ईव्ही ग्राहक myHyundai ॲपद्वारे या 24×7 चार्जिंग स्टेशन्सवर सोयीस्करपणे प्रवेश करू शकतात. सध्या, चेन्नईतील स्पेन्सर प्लाझा आणि BSR मॉल आणि तिरुवन्नमलाई येथील हॉटेल सीझनमध्ये तीन चार्जिंग स्टेशन पूर्णपणे कार्यरत आहेत.

 

Web Title: Hyundai to set up 600 ev charging stations in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 09:28 PM

Topics:  

  • Charging Station
  • india

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.