Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य

इलिनॉयमध्ये ई-बाईक्समुळे मुलांच्या अपघातांत मोठी वाढ झाल्याने गव्हर्नर प्रित्झकर यांनी नवीन कायदा केला आहे. या कायद्यानुसार आता वेगाने धावणाऱ्या ई-बाईक्स थेट मोटार वाहनांच्या श्रेणीत येणार असून, चालकांवर कडक नियम लागू होणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 10:10 PM
अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य
Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेतील इलिनॉय गव्हर्नर प्रित्झकर यांनी नवीन ई-बाईक नियमन विधेयकावर स्वाक्षरी केली असून १ जानेवारीपासून कठोर कायदे लागू होणार आहेत.
  • ताशी २८ मैलांपेक्षा वेगाने धावणारी ई-वाहने आता मोटार वाहन म्हणून गणली जातील व मद्यधुंद चालकांचे कायदे लागू होतील.
  • मुलांच्या सुरक्षेसाठी ई-बाईक आणि ई-स्कूटर चालवण्याकरिता किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, वाहन नोंदणी अनिवार्य आहे.

अमेरिकेतील इलिनॉय राज्याचे गव्हर्नर जे. बी. प्रित्झकर यांनी नुकत्याच एका नवीन ई-बाईक नियमन विधेयकावर स्वाक्षरी केली आहे, ज्याचा उद्देश राज्यामधील वेगाने वाढणाऱ्या ई-बाईक आणि ई-स्कूटर्सच्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालणे हा आहे. अमेरिकेत विशेषतः मुलांमध्ये ई-बाईक्स आणि मोटारयुक्त मायक्रोमोबिलिटी उपकरणांच्या वापरामुळे आपत्कालीन वैद्यकीय विभागातील (Emergency Room) उपचारांसाठी जाणाऱ्या मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका अभ्यासानुसार, २०२३ ते २०२६ या कालावधीत अशा उपकरणांमुळे जखमी होऊन उपचारांसाठी येणाऱ्या मुलांच्या प्रमाणात ७.५ पटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

या नवीन कायद्यामुळे ई-बाईक्सचे तीन वर्ग कायम ठेवण्यात आले आहेत, ज्यांचा वेग ताशी २८ मैलांपर्यंत मर्यादित असेल. परंतु, जे ई-बाईक, ई-मोटो, ई-स्कूटर, इलेक्ट्रिक युनिसिकल आणि इलेक्ट्रिक स्केटबोर्ड ताशी २८ मैलांपेक्षा जास्त वेगाने जाऊ शकतात, त्यांना आता अधिकृतपणे ‘मोटार वाहन’ (Motor Vehicles) म्हणून वर्गीकृत केले जाईल. विशेष म्हणजे, १ जानेवारीपासून या अतिवेगी वाहनांचे चालवणाऱ्या चालकांना राज्याच्या मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालवण्याच्या (Drunken Driving) कायद्यांनुसार कारवाईला सामोरे जावे लागेल.

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

या हाय-स्पीड वाहनांच्या मालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे, विमा काढणे आणि राज्याकडे वाहन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, ही वाहने सायकल मार्ग किंवा काही ठराविक सायकल लेन्सवर चालवण्यास सक्त मनाई असेल. स्थानिक पातळीवर निर्माण होणारे वेगवेगळे नियम रद्द करून संपूर्ण इलिनॉय राज्यात एकसमान नियम लागू करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

याशिवाय, मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात वयोमर्यादेचे नियम देखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार:

  • ताशी २० मैलांपर्यंत वेग असलेल्या क्लास १ आणि क्लास २ ई-बाईक चालवणाऱ्यांचे वय किमान १५ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • ताशी २८ मैलांपर्यंत वेग असलेल्या क्लास ३ ई-बाईकसाठी किमान वय १६ वर्षे ठरवण्यात आले आहे.
  • ताशी १५ मैल मर्यादा असलेल्या ई-स्कूटर वापरकर्त्यांचे वय देखील किमान १६ वर्षे असावे.
गव्हर्नर प्रित्झकर यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की, हे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नियम पालक, चालक आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेसाठी अत्यंत स्पष्टता आणतील. तसेच, यामुळे लहान मुलांचे होणारे गंभीर अपघात रोखण्यास मोठी मदत होईल आणि रस्ते व सायकल मार्गांवरील सुरक्षितता अधिक मजबूत होईल.

 

Web Title: Illinois e bike regulation law auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!
1

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत
2

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!
3

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!
4

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.