
फोटो सौजन्य: @PluginJourneys/X.com
भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माने तिची नवीन आणि अतिशय खास इलेक्ट्रिक कार MG Cyberster आहे. कंपनीच्या मते, ही जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार आहे. शफाली ही त्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे जिने खूप लहान वयात तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. नुकत्याच झालेल्या 2025 च्या आयसीसी महिला विश्वचषकात तिच्या चमकदार कामगिरीमुळे भारताचा विजय झाला.
98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?
MG Cyberster ही कार विशेषत: अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना नेहमी वाटते की त्यांची कार हटके दिसावी. यात लांब स्वीपिंग बोनट असून त्यातून क्लासिक ब्रिटिश रोडस्टरची झलक दिसते. इलेक्ट्रिक सिझर डोर्समुळे कारला सुपरकारसारखा प्रभावी लुक मिळतो. याचे ओपन-टॉप इलेक्ट्रिक रूफ केवळ 10 सेकंदांत उघडते. कारची शार्प आणि बोल्ड साइड प्रोफाइल तिला एथलेटिक आणि दमदार स्टान्स देते.
ही कार फक्त दिसायला स्पोर्टी नाही, तर चालवायला देखील अत्यंत पॉवरफुल आहे. यात ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळतो, जो 510 PS ची पॉवर आणि 725 Nm टॉर्क निर्माण करतो. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 km/h स्पीड पकडू शकते.
कारमधील ड्रायव्हर-सेंट्रिक डिजिटल कॉकपिट आणि ॲक्टिव्ह एयरोडायनॅमिक्स याला अधिक खास बनवतात. ओपन-टॉप ड्रायव्हिंग आणि इलेक्ट्रिक परफॉर्मन्सचा हा उत्तम कॉम्बिनेशन, ड्रायव्हिंगला केवळ एक प्रवास नव्हे तर एक अनुभव आणि रोमांच मानणाऱ्यांसाठी उत्तम ठरतो.
भारतात MG Cyberster ची किंमत 75 लाखांपासून (एक्स शोरूम) सुरु होते. त्यामुळे नक्कीच ही कार तिच्या किमतीमुळे प्रीमियम आहे, हे मानण्यास काही हरकत नाही.