Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन Tata Punch EV 2026 मध्ये असे कोणते बदल झाले आहेत? रेंज तर वाढलीच मात्र सेफ्टी…

नुकतेच टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच झाले आहे. चला जाणून घेऊयात, या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कोणते बदल करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 05:43 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Punch EV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • नुकतेच Tata Punch EV चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच
  • या नवीन मॉडेलमध्ये कोणते बदल करण्यात आले? चला जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात Tata Motors च्या वाहनांना नेहमीच ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपनी देखील ग्राहकांच्या अपेक्षेनुसार दमदार कार ऑफर करत असते. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी वाढीव मागणी पाहता टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर देखील विशेष लक्ष देत आहे. नुकतेच कंपनीने Tata Punch EV चे Facelift व्हर्जन लाँच केले आहे.

टाटा पंच ईव्हीच्या 2026 च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. यावेळी, कंपनीने कारच्या बॅटरी, रेंज आणि चार्जिंगवरही लक्ष केंद्रित केले आहे. नवीन पंच ईव्ही आता लॉंग रेंज देण्यासोबतच चार्जिंगसाठी कमी वेळ घेते. यामुळे किंमतीतही लक्षणीय बदल झाला आहे.

नवीन आणि आकर्षक अवतारात येतेय Maruti Suzuki Brezza, जाणून घ्या इंटिरिअर आणि डिझाइनमधील बदल

नवीन किंमत आणि BaaS प्लॅनमुळे परिस्थिती बदलली

सर्वात मोठा बदल कारच्या नवीन किंमतीत दिसून आला आहे. टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाखांपासून सुरू होते आणि 12.59 लाखांपर्यंत जाते. मात्र, जर ग्राहकांनी BaaS (बॅटरी सबस्क्रिप्शन) प्लॅन निवडला तर सुरुवातीची किंमत फक्त 6.49 लाख रुपये आहे. BaaS प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना बॅटरीची संपूर्ण किंमत एकत्र भरावी लागत नाही; ते किती किलोमीटर चालवतात यावर आधारित बॅटरीसाठी पैसे द्यावे लागतात. यामुळे वाहन खरेदी करणे सोपे होते आणि सुरुवातीचा खर्च कमी होतो. हा पर्याय पूर्वी उपलब्ध नव्हता, म्हणून हा एक मोठा बदल मानला जातो.

मोठी बॅटरी आणि अधिक रेंज

नवीन Tata Punch EV मध्ये आधीच्या 25 kWh आणि 35 kWh बॅटरीऐवजी आता 30 kWh आणि 40 kWh क्षमतेच्या मोठ्या बॅटऱ्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी या कारची रेंज 265 किमी आणि 365 किमी इतकी होती; ती आता वाढून अंदाजे 375 किमी आणि 468 किमी झाली आहे. म्हणजेच दोन्ही व्हेरिएंटमध्ये सुमारे 100 किमीपर्यंत जास्त रेंज मिळत आहे, जे दैनंदिन वापरासह लांब प्रवासासाठीही फायदेशीर ठरेल.

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

फास्ट चार्जिंगचा अधिक लाभ

चार्जिंग सुविधेतही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी डीसी फास्ट चार्जिंग 50 किलोवॅटपर्यंत मर्यादित होती; आता ती वाढवून 65 किलोवॅट करण्यात आली आहे. त्यामुळे कारची बॅटरी 20 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत फक्त 26 मिनिटांत चार्ज होऊ शकते. आधी यासाठी 40 ते 56 मिनिटे लागत होती. एसी चार्जिंग क्षमता मात्र पूर्वीसारखीच 7.2 किलोवॅट आहे. तरीही वेगवान डीसी चार्जिंगची सुविधा घरच्या घरी चार्जिंगची सोय नसलेल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरते.

फीचर्स आणि सुरक्षेमध्ये काय बदल?

फेसलिफ्ट मॉडेलमध्ये बहुतांश आधीचे फीचर्स कायम ठेवण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग, ईएसपी, 360 डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी सुरक्षा व सोयीची फीचर्स उपलब्ध आहेत. नव्या अपडेट्समध्ये हाय बीम असिस्टसारखे फीचर तसेच इन्फोटेनमेंट इंटरफेसमध्ये काही लहान बदल करण्यात आले आहेत.

Web Title: What changes done in tata punch ev facelift 2026 know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • New car Launch
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?
1

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?

टाटा सिएरा डार्क रेंज लाँच, १३.९९ लाखांपासून मिळणार दमदार ब्लॅक लूक; जाणून घ्या सविस्तर
2

टाटा सिएरा डार्क रेंज लाँच, १३.९९ लाखांपासून मिळणार दमदार ब्लॅक लूक; जाणून घ्या सविस्तर

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
3

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
4

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.