फोटो सौजन्य: Gemini
प्रीमियम कारची चर्चा होण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे त्यांची आभाळाला भिडणारी किंमत. भारतात लँड रोव्हरच्या लक्झरी कार भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. Defender ही बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे.
लँड रोव्हर डिफेंडरची किंमत 98 लाख ते 2.60 कोटी रुपयांपर्यंत आहे. या लक्झरी कारचे सर्वात स्वस्त मॉडेल 2.0-लिटर पेट्रोल 110 एक्स-डायनॅमिक एचएसई आहे. डिफेंडरचा हा व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारा व्हेरिएंट आहे. डिफेंडरच्या या मॉडेलची किंमत 98 लाख रुपये आहे. ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी 88.20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.
Eco मोड कधी वापरावा? आणि पॉवर मोड कधी? बाईकचे परफॉर्मन्स टिकवा…
डिफेंडर ही इतकी महागडी कार आहे की ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी तुम्ही चार वर्षांसाठी लोन घेतले तरी, तुमच्या खर्चाव्यतिरिक्त EMI भरण्यासाठी तुमच्याकडे किमान दोन लाख रुपये असणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही 9.80 लाखांचे डाउन पेमेंट केले आणि कारचा व्याजदर 9% असेल, तर चार वर्षांच्या लोनमुळे महिन्याचा EMI तब्बल 2.20 लाख रुपये होईल.
डिफेंडर खरेदी करताना तुम्ही जास्त रक्कम डाउन पेमेंट म्हणून भरली, तर तुमचा महिन्याचा EMI कमी होईल. मात्र, कार खरेदीसाठी लोन घेताना सर्व कागदपत्रे नीट वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कार कंपन्या आणि बँकांच्या पॉलिसी वेगवेगळ्या असल्यामुळे या आकड्यांमध्ये फरक दिसू शकतो.






