Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सैनिकांनी चालवली Jawa Yezdi Motorcycles! कारगिल विजय दिनानिमित्त विशेष उपक्रम

भारतीय सेना आणि जावा येझदी मोटरसायकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शौर्य विजय यात्रा' कारगिल विजय दिनी द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलमध्ये संपन्न झाली. नवी दिल्ली ते द्रास असा १,९०० किमींचा प्रवास कार्यरत व निवृत्त सैनिक, वीर नारी, हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि रायडर्सनी पूर्ण केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 07:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सेना आणि जावा येझदी मोटरसायकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य विजय यात्रे’चा समारोप द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियलमध्ये झाला. नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेल्या या सुमारे १,९०० किलोमीटरच्या प्रवासात कार्यरत आणि निवृत्त लष्करी अधिकारी, वीर नारी, हुतात्म्यांचे कुटुंबीय तसेच सामान्य रायडर्स सहभागी झाले. या मोहिमेचा उद्देश १९९९ च्या कारगिल युद्धातील शूरवीरांच्या पराक्रमाला अभिवादन करण्याबरोबरच नागरिक आणि भारतीय सेनेतील नाते अधिक दृढ करणे हा होता.

लहान मुलांसाठी TVS ची पहिली रेस बाइक! 20 PS पॉवर अन् 110 चा स्पीड; TVS ची नवी Apache RR 200 Mini GP बाइक लाँच!

या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे नॅशनल वॉर मेमोरियलवरील पवित्र माती सन्मानपूर्वक कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचवण्यात आली. हा उपक्रम देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि त्याचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पिढ्यांना प्रतीकात्मकरीत्या जोडणारा ठरला. हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील कठीण मार्ग पार करत रायडर्सनी चंडीमंदिर, रेझांग ला आणि लेह वॉर मेमोरियलसारख्या महत्त्वाच्या लष्करी स्मारकांनाही भेट देत शहीदांना आदरांजली अर्पण केली.

२०२१ पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश भारतीय सैनिकांच्या शौर्यकथा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या मोहिमेत रायडिंग समुदाय, माजी सैनिक, वीर नारी आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याने हा उपक्रम केवळ बाइक राईड न राहता नागरिक आणि लष्कर यांच्यातील भावनिक दुवा बनला आहे. यंदाच्या यात्रेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. या वेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी, माजी सैनिक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच! सुरुवातीची किंमत १,२४,९९९ रुपये;पाहा इंटरेस्टिंग फीचर्स

ही मोहीम जावा 350, जावा 42, जावा 42 FJ, येझदी ॲडव्हेंचर आणि येझदी स्क्रॅम्बलर अशा मोटरसायकलींसह पूर्ण करण्यात आली. क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितले की, भारतीय शूरवीरांच्या त्यागाची प्रेरणादायी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. कारगिल विजय दिनी द्रास येथे झालेल्या समारोपाने शौर्य, सेवा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला.

Web Title: Indian soldiers rode jawa yezdi motorcycles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.