भारतातील समकालीन ऑटोमोटिव्ह वारशाचा सर्वात मोठा उत्सव मॉडर्न क्लासिक रॅली आता 2025 मध्ये अधिक मोठ्या स्वरूपात आणि अधिक क्लासिक कार्ससह परत येत आहे! ऑटोकॉर इंडिया आयोजित हा इव्हेंट 1 आणि 2 मार्च 2025 रोजी होणार आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक कोटक महिंद्रा प्राइम असून, विस्टा ऑटो केअर, एडवांटेक व्हील्स, मोबिल आणि ग्रँड हयात मुंबई हे देखील भागीदार आहेत.
1 मार्च 2025 रोजी ग्रँड हयात मुंबई येथे मॉडर्न क्लासिक शोकेस होणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत हा खास टिकटेड शोकेस आयोजित केला जाईल, जिथे 70 ते 90 च्या दशकांतील 80 हून अधिक प्रतिष्ठित मॉडर्न क्लासिक कार्सचे अप्रतिम कलेक्शन प्रदर्शित केले जाईल. पॉर्शे, मासेराती, फेरारी, लैम्बॉर्गिनी, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू, डॉज, लँड रोव्हर, जग्वार, एक्यूरा यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या कार्स याठिकाणी पाहायला मिळतील. दुर्मिळ JDM स्पोर्ट्स कार्स, इटालियन मास्टरपीस, आणि जर्मन परफॉर्मन्स कार्स या इव्हेंटचे प्रमुख आकर्षण असतील. याशिवाय, कार मालक आणि कलेक्टर्ससोबत संवाद साधण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या गाड्यांविषयीच्या आठवणी व अनुभव ऐकता येणार आहेत.
2 मार्च 2025 रोजी मॉडर्न क्लासिक रॅलीचा थरार मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार आहे. हा फक्त निमंत्रणावर आधारित इव्हेंट असणार आहे, जिथे हे ऐतिहासिक वाहनांचे ताफे मुंबईच्या प्रमुख मार्गांवरून धावतील. सकाळी 10:30 वाजता ग्रँड हयात मुंबई येथून रॅली सुरू होईल आणि बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा-वर्ली सी लिंक, अमरसन्स गार्डन मार्गे पुन्हा ग्रँड हयात येथे समारोप होईल. यामुळे प्रेक्षकांना चालत्या-फिरत्या ऑटोमोटिव्ह इतिहासाचा थरारक अनुभव घेता येईल.
गेल्या काही दशकांत मॉडर्न क्लासिक्स कलेक्टर्सच्या जगात वेगळी ओळख निर्माण करू लागल्या आहेत. ह्या कार्स एनालॉग चार्म आणि आधुनिक इंजिनिअरिंग यांचा परिपूर्ण संगम आहेत आणि आजही कारप्रेमींना रोमांचित करतात. ग्लोबल टूरर्सची प्रतिष्ठित डिझाईन, स्पोर्ट्स कूपेची मेकॅनिकल पवित्रता किंवा परफॉर्मन्स सेडान्सचा दमदार कॅरेक्टर यामुळे या गाड्या अजूनही एक वेगळा आकर्षण ठरतात. ऑटोकार इंडिया संपादक होर्मज़द सोराबजी यांच्या मते, “या कार्सची मेकॅनिकल अपील आणि डिझाईनची पवित्रता त्यांना खूप खास बनवते. आजच्या डिजिटल युगात, या कार्स कारप्रेमींसाठी एक परफेक्ट डिजिटल डिटॉक्स आहेत.” तर, मॉडर्न क्लासिक रॅली 2025 चे क्युरेटर पर्सियस बंद्रावाला म्हणतात, “मॉडर्न क्लासिक्स म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक प्रिसिजन यांचा अद्भुत मिलाफ! या कार्स ड्रायव्हिंगच्या सुवर्णयुगाचे प्रतीक आहेत आणि त्या आपल्या लहानपणीच्या आठवणींना जिवंत करतात – जेव्हा त्या आपल्या पोस्टर्स आणि मॅगझिनच्या कव्हर्सवर असायच्या.”
हा फक्त एक इव्हेंट नाही, तर मॉडर्न क्लासिक्सना समर्पित एक उत्सव आहे, ज्यांनी ऑटोमोटिव्ह इतिहासावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे! तुम्ही कलेक्टर असाल, एंथूज़ियास्ट असाल, किंवा फक्त उत्कृष्ट कार्स पाहायला आवडत असतील – हा अनुभव तुम्ही चुकवू इच्छित नाही!