
एचएसआरपी बसवण्यासाठी जवळपास १ कोटी अर्ज प्राप्त
येत्या काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा
एचएसआरपी बसवण्याची पहिली अंतिम मुदत ३१ मार्च २०२५
पुणे: राज्य परिवहन विभागाला आतापर्यंत एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी जवळपास १ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) तसेच उर्वरित राज्यात ७३ लाखांहून अधिक वाहनांवर नवीन विशेष नोंदणी प्लेट बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित २७ लाख वाहनांवर मुदत संपल्यानंतरही एचएसआरपी बसवलेले नाही. येत्या काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
एचएसआरपी बसवण्याची पहिली अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली. यापुढे मुदतवाढ दिली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नसल्याने, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओकडून लवकरच कारवाई सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
२०२५ मधील एचएसआरपी अर्ज
१५ जानेवारी : १,०००
३ फेब्रुवारी : १ लाख
१२ मार्च : १० लाख
१६ एप्रिल : २० लाख
१९ मे : ३० लाख
१७ जून : ४० लाख
१२ ऑगस्ट : ६४ लाख
३१ डिसेंबर : जवळपास १ कोटी
HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
राज्यात एचएसआरपी बसवलेली वाहने
७३ लाखांहून अधिक
एचएसआरपी का आवश्यक?
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी बंधनकारक आहे. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत नवीन वाहनांवर ही नंबर प्लेट आधीपासूनच बसवलेली असते. त्यामुळे नवीन दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना नंबर प्लेट बदलण्याची गरज नाही.
एचएसआरपीची वैशिष्ट्ये
नोंदणी क्रमांकासाठी एकसारखा (युनिफॉर्म) फॉन्ट व नमुना
नोंदणी क्रमांकाच्या डाव्या बाजूला क्रोमियम-आधारित अशोकचक्र
सहज स्कॅन करता येईल असा लेझर-कोडेड पिन
हॉट-स्टॅम्प्ड क्रोमियम-आधारित होलोग्राम
न बदलता येणारे स्नॅप-लॉक्स (पुन्हा वापरता येणार नाहीत)
अधिकृत व निवडलेल्या वाहन विक्रेत्यांकडेच बसवण्याची सुविधा
RTO News : प्रवाशांसाठी डिजीटल सुरक्षा व्यवस्था; वाहनांमध्ये VMT आणि पॅनिक बटन अनिवार्य
नंबर प्लेट बसवण्याचा खर्च (GST वेगळा)
वाहने खर्च
दुचाकी ४५०
तीनचाकी ५००
चारचाकी ७४५
एचएसआरपीचे फायदे
मनमानी फॉन्टच्या नंबर प्लेट्सना आळा (फॉन्ट बदलता येणार नाही)
नॉन-रियुजेबल स्नॅप-लॉक्समुळे चोरी करणे कठीण
प्लेट काढताना नुकसान होणार असल्याने गैरवापर रोखता येतो