Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने डिसेंबर २०२५ मध्ये ४.४६ लाख युनिट्सची विक्री करून ४५% वार्षिक वाढ नोंदवली आहे. नेटवर्क विस्तार आणि रस्ता सुरक्षा उपक्रमांसह कंपनीने दुचाकी बाजारात आपली आघाडी कायम ठेवली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 06, 2026 | 06:35 PM
टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप (Photo Credit - X)

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ!
  • डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री
  • वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप
मुंबई /गुरुग्राम, 06 जानेवारी 2026: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने डिसेंबर 2025 मध्ये एकूण 4,46,048 युनिट्सची विक्री नोंदवली. ही कामगिरी मजबूत मागणी आणि ग्राहकांसाठी सुरक्षित, स्वच्छ व अधिक सुलभ मोबिलिटी उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. यामध्ये 3,92,306 युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि 53,742 युनिट्सची निर्यात समाविष्ट आहे.

एचएमएसआय ने डिसेंबर 2024 च्या तुलनेत 45% वार्षिक वाढ (YOY Growth) साधली. ही कामगिरी एचएमएसआय च्या उत्पादन पोर्टफोलिओसाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या मजबूत मागणीचे द्योतक आहे.

FY26 (एप्रिल–डिसेंबर 2025) या Year-to-Date (YTD) कालावधीत, एचएमएसआय ने एकूण 46,78,814 युनिट्सची विक्री केली. यामध्ये 42,04,420 युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि 4,74,394 युनिट्सची निर्यात समाविष्ट असून, डिसेंबर 2024 च्या तुलनेत 3% वार्षिक वाढ नोंदवली आहे.

गुंतवणूक होणार अधिक सुरक्षित! बजाज ब्रोकिंग आणि NSDL मध्ये ऐतिहासिक भागीदारी; गुंतवणूकदारांसाठी आणणार नवे फीचर्स

एचएमएसआय चे डिसेंबर 2025 मधील प्रमुख ठळक मुद्दे:

रस्ता सुरक्षा: “Safety for Everyone” या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, एचएमएसआय ने देशभरात रस्ता सुरक्षा मोहिमा आयोजित केल्या. या मोहिमा नवी दिल्ली, जयपूर, सोलापूर, मेरठ, भोपाळ, रांची, राजकोट, गोवा, कॅलिकट, राजमुंद्री, लुधियाना, समस्तीपूर आणि हसन अशा विविध ठिकाणी पार पडल्या. या उपक्रमांमधून जबाबदार वाहनचालकत्व आणि सामुदायिक जागरूकता यांना प्रोत्साहन देऊन सर्वांसाठी सुरक्षित रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याशिवाय, एचएमएसआय ने रायपूरमध्ये रस्ता सुरक्षा अधिवेशन आयोजित केले. या अधिवेशनात शिक्षकांना सहभागी करून मुलांमध्ये सुरक्षित वाहनचालक सवयी रुजवण्यावर भर देण्यात आला, ज्यामुळे लहानपणापासूनच सुरक्षा संस्कृती विकसित होईल.

नेटवर्क विस्तार: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने औरैया, बेंगळुरू, दिल्ली आणि झारग्राम येथे नवीन अधिकृत डीलरशिप्स सुरू करून आपली उपस्थिती वाढवली. या डीलरशिप्सना विशेष प्रशिक्षित विक्री व सेवा टीमचे समर्थन मिळत असून, ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन व सहाय्य देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे ग्राहक केंद्रित मोबिलिटी सोल्यूशन्सबद्दलची कंपनीची बांधिलकी अधोरेखित होते. पुढे जाताना, एचएमएसआय चे लक्ष स्पष्ट आहे ग्राहकांना सक्षम करणारी मोबिलिटी प्रदान करणे, सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि शाश्वत भविष्यास हातभार लावणे.

Web Title: Honda creates a stir in the two wheeler market 446 lakh vehicles sold in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • automobile news
  • Honda

संबंधित बातम्या

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
1

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?
2

HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित
3

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…
4

Kia ने केला खेळ खल्लास! सर्व कंपन्यांची उडाली झोप; डिसेंबर 2025 मध्ये तब्बल 2 लाखांपेक्षा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.