फोटो सौजन्य: iStock
विमान असो की सामान्य वाहनं, दोघांना चालण्यासाठी इंधनाची गरज असते हे आपण सर्वेच जाणतो. मात्र अनेक जणांना असे वाटते की कारमध्ये वापरले जाणारे पेट्रोलच विमानात वापरले जाते. तुम्हाला सुद्धा असेच वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
वास्तविक, जेट इंजिन हे सामान्य वाहनांच्या इंजिनपेक्षा वेगळे असते आणि ते जास्त शक्तिशाली सुद्धा असते. अशा परिस्थितीत, यासाठी विशेष प्रकारचे इंधन वापरले जाते, ज्याला एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) किंवा जेट इंधन म्हणतात. हे इंधन वाहनांमधील पेट्रोलपेक्षा वेगळे आहे आणि ते जेट इंजिनसाठी खास तयार केले गेले आहे जेणेकरून ते जास्त उंचीवर आणि थंड तापमानातही स्थिरपणे काम करू शकेल.
हे देखील वाचा: बाईकचा ब्रेक अचानक फेल झाल्यास तिला थांबवावे कसे? सुरक्षित प्रवासासाठी जाणून घ्या
भारतात एटीएफची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त आहे. तथापि, वेळ, ठिकाण, कर धोरण आणि आंतरराष्ट्रीय ऑइल बाजार यानुसार या किंमती बदलू शकतात.
जेट फ्युएल हे प्रामुख्याने केरोसीनवर आधारित असते आणि त्यात अनेक विशेष पदार्थ जोडले जातात जेणेकरून ते उंचीवर स्थिरपणे जळू शकते. सामान्य पेट्रोल हे हलक्या हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते, तर एटीएफमध्ये जटिल हायड्रोकार्बन्स असतात, ज्यामुळे त्याची ऊर्जा घनता जास्त असते.
एटीएफचा फ्लॅश पॉइंट (ज्या तापमानाला ते जळण्यास सुरुवात होते) पेट्रोलच्या तुलनेत जास्त आहे, ज्यामुळे ते अत्यंत थंड तापमानात आणि जास्त उंचीवर वापरण्यास योग्य बनते. पेट्रोलच्या कमी फ्लॅश पॉइंटमुळे, ते लवकर बाष्पीभवन होते आणि ज्वलनशील बनते, जे जेट इंजिनसाठी सुरक्षित नाही.
हे देखील वाचा: Tata Punch साठी 2 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास फक्त भरावा लागेल ‘इतका’ EMI
एटीएफची एनर्जी डेन्सीटी पेट्रोलपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ ते त्याच प्रमाणात अधिक ऊर्जा प्रदान करते. म्हणूनच हे लांब पल्ल्याच्या फ्लाइटसाठी योग्य आहे. पेट्रोलमध्ये एनर्जी डेन्सीटी कमी असल्याने ते विमानासाठी योग्य नाही.
जेट फ्युएल अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते कमी तापमानात गोठत नाही आणि उच्च दाबातही स्थिर राहते. जास्त उंचीवर वापरण्यासाठी पेट्रोल स्थिर नसते आणि थंड तापमानात ते गोठू शकते, जे उड्डाण दरम्यान अत्यंत धोकादायक असू शकते.
एटीएफमध्ये विविध प्रकारचे ॲडिटीव्ह जोडले जातात, जसे की अँटी-फ्रीझ आणि अँटी-ऑक्सिडंट्स, जेणेकरुन ते इंधन टाकीमध्ये गोठत नाही आणि ते जास्त वेळ टिकेल. .