फोटो सौजन्य: iStock
हिवाळ्याचे दिवस चालू झाले आहे. या काळात अनेक जण माळशेज घाट, माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. त्यातही जर तुमच्याकडे बाईक आणि मित्रपरिवार असेल तर नक्कीच लॉंग ट्रिपचा प्लॅन बनतो. हल्ली अनेक जण विकेंडला बाईक काढून फिरायला निघतात. परंतु अशावेळी काही गोष्टींची खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे.
तुमच्या बाईकचा ब्रेक अचानक काम करण्यास बंद झाला तर अशावेळी बाईक थांबवणे खूप कठीण होऊन बसते. आणि जर तुमची बाईक जास्त वेगात असेल तर हे आणखी कठीण होते. असे झाल्यानंतर, प्रत्येक बाईक चालकास चिंता वाटू शकते आणि कोणताही निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची ब्रेक फेल झालेली बाईक अतिशय वेगात असताना सुद्धा आरामात थांबवू शकता.
हे देखील वाचा: Tata Punch साठी 2 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास फक्त भरावा लागेल ‘इतका’ EMI
सर्वप्रथम, बाईकचा वेग कमी करण्यासाठी गिअर हळूहळू खाली करा. गिअर डाउनशिफ्ट केल्याने इंजिन ब्रेकिंग होईल, ज्यामुळे बाईकचा वेग कमी होण्यास मदत होते. गिअर्स अचानक खाली करू नका, तर एक एक करून गिअर डाऊन करा जेणेकरून बाईक स्थिर राहते.
क्लच हळू हळू सोडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही क्लच पूर्णपणे दाबून ठेवले तर तुम्हाला इंजिन ब्रेकिंगचा फायदा मिळणार नाही. क्लच हळूहळू सोडल्याने गिअर इंजिनद्वारे बाईकचा वेग कमी होण्यास मदत होईल.
जर बाईकचा वेग जास्त नसेल, तर इंजिन बंद करणे हा देखील एक पर्याय असू शकतो, यामुळे इंजिन ब्रेकिंग प्रभावी होईल. लक्षात ठेवा की यामुळे हँडलिंग थोडी कठीण होऊ शकते, म्हणून फक्त कमी वेगात बाईक असतानाच इंजिन बंद करण्याचा प्रयत्न करा.
वाटेत उतार किंवा मोकळा भाग निवडा जेणेकरून तुम्ही नियंत्रित पद्धतीने बाईकचा वेग कमी करू शकता. जर कोणती गवताने झाकलेली जागा असेल तर बाईक हळू हळू त्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करा, यामुळे घर्षण वाढेल आणि बाईकचा वेग कमी होईल.
वाटेत कोणतीही भिंत, रेलिंग किंवा इतर स्थिर वस्तू असल्यास, त्यावर आपल्या पायाने हळूवारपणे दाब देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाईकचा वेग कमी होण्यास मदत होईल.
जर ब्रेक निकामी झाले आणि तुम्ही बाईक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल तर हॉर्न आणि इंडिकेटर वापरा जेणेकरून इतरांना तुमची परिस्थिती समजेल आणि ते तुम्हाला मार्ग देईल. यामुळे तुमच्या मदतीला लोकं धावून सुद्धा होऊ शकते.
जेव्हा बाईकचा वेग लक्षणीयरीत्या कमी होतो, तेव्हा तुमचे पाय हळूहळू जमिनीवर ठेवा आणि घर्षण करून थांबण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमच्या बाईकचा वेग खूपच कमी असेल तेव्हाच ही पद्धत अवलंबा.