Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawa All Stars 42 FJ जावा येझदीने भारतात लाँच! किंमत २.०२ लाख रुपयांपासून सुरु

जावा येझदीने भारतात लाँच केलेल्या नवीन 'जावा ऑल स्टार्स ४२ एफजे' बाईकमध्ये नेमके काय खास बदल करण्यात आले आहेत? निओ-क्लासिक श्रेणीतील या २.०२ लाख रुपयांच्या नवीन बाईकचे फीचर्स आणि आकर्षक रंग ग्राहकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरतील का? चला पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 28, 2026 | 08:00 AM
Jawa All Stars 42 FJ जावा येझदीने भारतात लाँच! किंमत २.०२ लाख रुपयांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • जावा येझदीने २.०२ लाख रुपये किमतीत नवीन ‘ऑल स्टार्स ४२ एफजे’ भारतात लाँच केली आहे.
  • यात ३३४ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन असून क्रोम फिनिशसह सहा आकर्षक रंगांचे पर्याय दिले आहेत.
  • बाईकमध्ये ६-स्पीड गिअरबॉक्स, ऑल-एलईडी लायटिंग आणि ड्युअल-चॅनल एबीएसची सुरक्षितता देण्यात आली आहे.

जावा येझदी मोटरसायकलने भारतीय बाजारात नवीन ‘जावा ऑल स्टार्स ४२ एफजे’ (Jawa All Stars 42 FJ) लाँच केली आहे. दिल्लीमध्ये या नवीन मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत २.०२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही नवीन एडिशन ‘जावा ऑल स्टार्स’ ब्रँडच्या ओळखीची सुरुवात असून ती चारित्र्य, आचरण आणि धाडस या संकल्पनेवर आधारित आहे.

रंग पर्याय आणि डिझाइन

या नवीन मोटरसायकलमध्ये मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र क्रोम फिनिशसह एकूण सहा आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये अरोरा ग्रीन, क्रोम, मॅट ब्लॅक विथ ब्लॅक क्लेड, मॅट ब्लॅक विथ रेड क्लेड, नेब्युला ब्लू आणि रेड या रंगांचा समावेश आहे. स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी यात ब्रश केलेल्या एल्युमिनियम टँक पॅनल्स, अधिक स्पोर्टी लूक आणि अतिरिक्त डिझाइन डिटेल्स देण्यात आले आहेत. तसेच यात ऑल-एलईडी लायटिंग आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे.

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

इंजिन आणि परफॉर्मन्स

या बाइकचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ३३४ सीसी, लिक्विड-कूल्ड, डीओएचसी सिंगल-सिलिंडर आहे. हे इंजिन ७,५०० आरपीएमवर २९.१७ पीएस पॉवर आणि ५,५०० आरपीएमवर २९.६२ एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. पॉवर ट्रान्समिशनसाठी इंजिनला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या श्रेणीतील इतर ३५0 सीसी मोटरसायकलच्या तुलनेत हे इंजिन ४२ टक्क्यांपर्यंत अधिक पॉवर देते, ज्यामुळे ही बाइक निओ-क्लासिक श्रेणीत अधिक स्पोर्टी ठरते.

चेसिस आणि ब्रेकिंग सिस्टीम

ही मोटरसायकल डबल-क्रेडल फ्रेमवर आधारित असून, यात ४१ मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ५-स्टेप प्रिलोड अड्जस्टमेंटसह गॅस-फिल्ड ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी यामध्ये ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टीमसह पुढे ३२० मिमी डिस्क आणि मागे २४० मिमी डिस्क ब्रेक दिला आहे. ही बाईक पुढे १०००/९०-१८ आणि मागे १४०/७० R१७ आकाराच्या टायरवर चालते. तसेच यात ७९० मिमी सीटची उंची, १७८ मिमी ग्राउंड क्लिनिझन्स आणि १२ लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे.

बाईकची सीट मॉडीफाय करायची आहे? या आहेत काही बेस्ट आयडिया आणि जरुरी गोष्टी

मालकी हक्क आणि वारंटी कार्यक्रम

जावा येझदी मोटरसायकल आपल्या ग्राहकांसाठी ‘ओनरशिप अ‍ॅश्युरन्स प्रोग्राम’ देखील देत आहे. यामध्ये ४ वर्षे किंवा ५०,००० किमीची मानक वारंटी, ६ वर्षांपर्यंतचे विस्तारित वारंटी पर्याय, ८ वर्षांपर्यंत रोडसाईड असिस्टन्स आणि ५ वर्षांपर्यंतचा एएमसी (AMC) समाविष्ट आहे. हा कार्यक्रम भारतातील ४५० हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रांवर उपलब्ध आहे. ऑल स्टार्स ४२ एफजे देशभरातील सर्व अधिकृत जावा येझदी डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Web Title: Jawa all stars 42 fj launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी आली नवीन ‘टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल-टोन स्पेक्ट्रल’, किंमत फक्त ८९,८२५ रुपये!
1

अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी आली नवीन ‘टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल-टोन स्पेक्ट्रल’, किंमत फक्त ८९,८२५ रुपये!

अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य
2

अमेरिकेत हाय-स्पीड ई-बाईक्स आता ‘मोटार व्हेईकल’ म्हणून गणल्या जाणार; ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सही होणार अनिवार्य

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!
3

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत
4

Honda ADV 160: होंडाची पहिली E85 फ्युल सपोर्ट करणारी दमदार स्कूटर मार्केटमध्ये दाखल! पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.