High Security Number Plate अजूनही बसवली नाही?
महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पहिली 31 मार्च 2025 होती. त्यानंतर ती 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर, 15 ऑगस्टपर्यंत नंबर प्लेट बदलण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, आता नवीन वर्षात ही नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत आहे.
‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित
RTO आणि वाहतूक पोलिसांनी फॅन्सी, अनधिकृत किंवा स्टायलिश नंबर प्लेट जसे की दादा, भाऊ, राजे अशा शब्दांच्या नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व जुन्या वाहनांना High Security Registration Plate (HSRP) बसवणे केंद्र व राज्य सरकारने अनिवार्य केले होते. वाहनांची सुरक्षितता आणि चोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या नंबर प्लेट्सवर विशेष लेझर कोड आणि युनिक ओळख क्रमांक असतो. मात्र, सरकारकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येऊनही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी अद्यापही या नियमाचे पालन केलेले नाही.
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चौकाचौकांत, प्रमुख रस्त्यांवर तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच
सुरुवातीला, ही रक्कम 1000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, जर तुम्ही पुन्हा उल्लंघन केले तर हा दंड 5000 ते 10000 रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच, ज्या वाहनांवर High Security Registration Plate (HSRP) अद्याप बसवलेली नसेल, अशा वाहनांशी संबंधित आरटीओची महत्त्वाची कामे जसे मालकी हस्तांतरण, वाहन पासिंग तसेच फिटनेस प्रमाणपत्र तात्पुरती थांबवले जाणार.
ही कारवाई टाळण्यासाठी, चालकांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत वेब पोर्टल,transport.maharashtra.gov.in वर रजिस्ट्रेशन करावे आणि तेथे योग्य पैसे द्यावेत. जर पावती वाहतूक पोलिसांना दाखवली तर वाहन मालकावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.






