
Jawa Yezdi अन् BSA'ने लाँच केले दमदार अपडेट्स ( सौजन्य - सोशल मीडिया )
हे व्यापक अपडेट्स जावा, येझदी आणि बीएसए यांच्या वर्षभरातील मजबूत प्रॉडक्ट मोमेंटमवर आधारित आहेत. वर्षभरात या तिन्ही ब्रँड्सनी नवीन मॉडेल्स आणि महत्त्वपूर्ण सुधारणांद्वारे रायडिंगच्या विविध विभागांमध्ये स्वतःचा पाया भक्कम केला आहे. येझदीची ‘अनटेम्ड ट्रिनिटी’, बीएसए स्क्रॅम्बलर 650 चा प्रवेश आणि जावाच्या ‘ऑल स्टार्स’ कुटुंबाचा विस्तार, यामुळे 2026 हे वर्ष या तिन्ही ब्रँड्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. सणासुदीच्या निमित्ताने केलेले हे बदल बाईकप्रेमींना या प्रत्येक ब्रँडचे वेगळेपण, वारसा आणि वैशिष्ट्ये अनुभवण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देतात.
येझदीसाठी या वर्षाची सुरुवात 23 एप्रिल रोजी स्क्रॅम्बलरच्या लाँचने झाली, त्यानंतर 30 जुलै रोजी रिफ्रेश्ड रेंज आणून ‘अनटेम्ड ट्रिनिटी’ पूर्ण करण्यात आली. येझदीचा निडर आणि बेधडक स्वभाव लक्षात घेऊन प्रत्येक बाईक स्वतंत्र रायडिंग फिलॉसॉफीवर तयार करण्यात आली आहे, तरीही त्या सर्वांमध्ये पर्यटनाची आणि शोध घेण्याची समान भावना आहे. 2026 च्या अपडेट्समध्ये पोर्टफोलिओमध्ये रायडर्ससाठी अनेक उपयुक्त सुधारणा केल्या गेल्या आहेत.
प्रामुख्याने ॲडव्हेंचरमधील ट्युबलेस क्रॉस-स्पोक व्हील्स आणि नवीन ‘यलो फाल्कन’ कलर, तसेच ‘ग्रीन मांबा रोडस्टर’ आणि ‘ग्रे पँथर स्क्रॅम्बलर’ या रंगांचा समावेश आहे. दैनंदिन दिनक्रमापेक्षा अनुभवांना प्राधान्य देणाऱ्या भटक्या, बंडखोर आणि मुक्त मनाच्या लोकांसाठी उत्तम बाईक्स देण्याची येझदीची वचनबद्धता या रिफ्रेश्ड रेंजमुळे अधिक दृढ होते.
बीएसएने 23 जुलै 2026 रोजी स्क्रॅम्बलर 650 सादर करून भारतात आपला विस्तार वाढवला, ज्यामुळे नव्या पिढीतील रायडर्सना ब्रँडचा अस्सल स्क्रॅम्बलर वारसा अनुभवता आला. बीएसएचा समृद्ध ब्रिटीश मोटरसायकल वारसा आणि इंजिनिअरिंग कौशल्याने प्रेरित स्क्रॅम्बलर 650 मध्ये क्लासिक डिझाईन, दैनंदिन उपयुक्ता आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. सणासुदीच्या काळातील हे अपडेट्स या प्रवासाला पुढे नेत भारतातील बीएसएचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करतात. आधुनिक रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करतानाच अस्सल ब्रिटीश मोटरसायकल्सचा वारसा टिकवून ठेवण्याचा ब्रँडचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो.
जावासाठी 2026 हे वर्ष त्यांच्या मॉडर्न-क्लासिक प्रवासातील एक मैलाचा दगड ठरले आहे. या प्रवासाची सुरुवात 26 ऑगस्ट रोजी ‘ऑल स्टार्स 42 एफजे’च्या लाँचने झाली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी ग्लोबल चेस लीगमध्ये श्री आनंद महिंद्रा यांच्या हस्ते ‘ऑल स्टार्स 42 बॉबर’चे अनावरण करण्यात आले. तर 9 सप्टेंबर रोजी मुंबईच्या ऐतिहासिक बॅलार्ड पियरवर—जिथे एकेकाळी पहिली जावा मोटरसायकल भारतात आली होती—’ऑल स्टार्स जावा 42 ओजी’ सादर करण्यात आली. आयकॉनिक जावा 42 मधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ठरला असून याने जावाच्या मॉडर्न-क्लासिक प्रवासातील ‘ऑल स्टार्स’ अध्याय पूर्ण केला.
क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “क्लासिक लेजेंड्ससाठी हे वर्ष अतिशय उत्साहवर्धक राहिले आहे; ज्यामध्ये जावा, येझदी आणि बीएसए या तिन्ही ब्रँड्सच्या नवीन मोटरसायकल्स आणि प्रॉडक्ट अपग्रेड्सचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात आलेले हे संपूर्ण पोर्टफोलिओ अपडेट्स तिन्ही ब्रँड्सना एक नवी ओळख देतात. रेंज जसजशी बदलत आहे, तसतसा आमचा मूळ हेतू तोच आहे—जावा, येझदी आणि बीएसएला वेगळेपण देणारा अस्सल स्वभाव आणि वारसा कायम जपणे.”
सणासुदीच्या या काळात नवी लाँचिंग्स, उत्पादनांमधील सातत्यपूर्ण विकास आणि भारतातील रायडिंग कम्युनिटीशी असलेले नाते अधिक घट्ट करत रिफ्रेश्ड जावा, येझदी आणि बीएसए रेंज रायडर्सना या ब्रँड्सच्या वैशिष्ट्यांशी जोडण्याचे नवे मार्ग खुले करत आहे.