Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावा, येझदी आणि BSA चा विस्तार! क्लासिक लेजेंड्सची विक्री 40% वाढली; 4 नवीन बाइक्स आणण्याची तयारी

महिंद्रा समूहाच्या क्लासिक लिजेंड्सने जावा, येझदी आणि BSA ब्रँड्सच्या माध्यमातून मोटरसायकल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. 450 हून जास्त सेवा केंद्रे आणि 4 नवीन मॉडेल्सच्या नियोजनामुळे कंपनीच्या पुढच्या वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 22, 2026 | 11:48 AM
Jawa Yezdi BSA Sales Growth And New Bikes (फोटो सौजन्य-AI एआय)

Jawa Yezdi BSA Sales Growth And New Bikes (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • जावा, येझदी आणि BSA मोटरसायकल्सच्या भारतातील विक्रीत आर्थिक वर्ष 2026 मध्ये 40% वाढ झाली.
  • क्लासिक लिजेंड्सने FY27 मध्ये चार नवीन मोटरसायकल मॉडेल्स सादर करण्याचे नियोजन केले आहे.
  • कंपनीचे सेवा नेटवर्क 450 केंद्रांवर पोहोचले असून FY28 पर्यंत 700 केंद्रांचे उद्दिष्ट आहे.
जावा, येझदी आणि BSA या काही मोजक्या मोटरसायकल ब्रँड्सना आजही मिळणारी ओळख आणि त्यांच्याशी जोडलेली भावनिक जोड इतरांना क्वचितच मिळते. क्लासिक लिजेंड्सने नव्या पिढीसाठी पुन्हा बाजारात आणलेले हे 3 प्रसिद्ध ब्रँड्स आज डिझाइन, कॅरेक्टर, कामगिरी आणि रायडरच्या व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देणारा आधुनिक क्लासिक मोटरसायकल व्यवसाय उभारत आहेत.

एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत, जावा येझदी आणि BSA मोटरसायकल्सच्या भारतातील विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 40% वाढ नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय विक्रीचा समावेश केल्यास, व्यवसायात 55% वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढता विस्तार लक्षात घेता, कंपनी आता पुढील विकासाच्या टप्प्यासाठी तयारी करत आहे.

जावा, येझदी आणि BSA या ब्रँड्समागील महिंद्रा समूहाची कंपनी असलेल्या क्लासिक लिजेंड्सने या 3 प्रसिद्ध ब्रँड्सच्या माध्यमातून आधुनिक क्लासिक मोटरसायकलच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कमी क्षमतेच्या दैनंदिन वापराच्या मोटरसायकलच्या तुलनेत, आकर्षक डिझाइन, वेगळी वैशिष्ट्ये आणि उत्तम कामगिरी यामुळे तरुण ग्राहकांचा कल या मध्यम क्षमतेच्या मोटरसायकलकडे वाढत आहे.

सत्तरच्या दशकात, जावा आणि येझदी यांनी भारतातील तरुणांच्या मनावर राज्य केले, त्या काळात या मोटरसायकल्स व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य आणि मोटरसायकल चालवण्याच्या संस्कृतीचे प्रतीक बनल्या होत्या. मात्र, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बाजारपेठेत मोठे बदल झाले. त्यामुळे भारतीय रायडर्सच्या अनेक पिढ्यांच्या मनात आजही खास आठवणी निर्माण करणाऱ्या या ब्रँड्ससमोर नवी आव्हाने उभी राहिली.

TVS Star City Plus Discontinued: टीव्हीएस स्टार सिटी प्लसची विक्री बंद; वेबसाइटवरूनही हटवली! जाणून घ्या कारण

मूळ ब्रँड्ससमोरील आव्हाने

नव्वदच्या दशकात, जपानी उत्पादकांनी स्थानिक कंपन्यांशी भागीदारी करून भारतात विस्तार केल्यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली. त्यांच्या हलक्या आणि कमी इंधन वापरणाऱ्या मोटरसायकल्समुळे ग्राहकांच्या अपेक्षा आणि संपूर्ण दुचाकी बाजारपेठ बदलू लागली. त्याच वेळी, प्रदूषण नियंत्रणाचे नियम अधिकाधिक कडक होत गेल्यामुळे 2-स्ट्रोक तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवणे कठीण होऊ लागले. या बदलांमुळे येझदीवर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर या ब्रँडच्या प्रवासाचा एक जुना अध्याय संपुष्टात आला.

नवीन सुरुवात: प्रचंड प्रतिसादापासून ते पुन्हा उभारणीच्या आव्हानापर्यंत

या नवीन सुरुवातीचा आरंभ 2018 मध्ये झाला. महिंद्रा समूहाच्या गुंतवणुकीच्या मदतीने, सह-संस्थापक अनुपम थरेजा आणि बोमन रुस्तम इराणी यांच्या नेतृत्वाखालील क्लासिक लिजेंड्सने जावा ब्रँड पुन्हा भारतात आणला. त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जावाला एकाच दिवसात 1,00,000 हून अधिक बुकिंग मिळाल्या, तर ऑनलाइन ग्राहकांची अभूतपूर्व गर्दी झाल्यामुळे कंपनीची वेबसाइट डाऊनच झाली. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी क्लासिक लिजेंड्सने वेगाने डीलरशिपचे नेटवर्क विस्तारले आणि उत्पादन क्षमता वाढवली.

सुरुवातीच्या या उत्स्फूर्त प्रतिसादातून हे स्पष्ट झाले की जावाचे भावनिक आकर्षण अजूनही कायम होते. भारतीयांच्या अनेक पिढ्यांच्या आठवणींमध्ये हा ब्रँड आजही जिवंत होता आणि नव्या पिढीलाही त्याचा अनुभव घेण्याची उत्सुकता होती. मात्र, या जुन्या आठवणी आणि सुरुवातीला मिळालेली मागणी यांचे रूपांतर दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायात करणे हे पुढचे मोठे आव्हान होते. त्यासाठी वेगळी ओळख असलेली उत्पादने, उत्कृष्ट कामगिरीसाठीचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान, विश्वासार्ह डीलरशिपचे नेटवर्क आणि विक्रीनंतरची सेवा यांची गरज होती.

कंपनी आपला व्यवसाय उभारत असतानाच कोविड-19 महामारी आली. या नवीन सुरुवातीच्या टप्प्यातच उत्पादन प्रक्रिया,सप्लाय चेन, डीलरशिप आणि विक्री यावर परिणाम झाला. प्रसिद्ध ब्रँड्सना पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या नव्या मोटरसायकल व्यवसायासमोर महामारीमुळे आणखी काही आव्हाने उभी राहिली. उत्पादन आणि वितरणावर परिणाम झाला आणि सुट्या भागांची उपलब्धता मिळवणे तसेच ग्राहकांना वेळेवर मोटरसायकलचा पुरवठा सुरू ठेवणे यांसारख्या अडचणींवर कंपनीला मात करावी लागली.

रॉयल एनफिल्डची 250cc Hybrid Motorcycle FY28 मध्ये येणार; 50 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळण्याची शक्यता

व्यवसायाला आकार: 3 ब्रँड्स आणि वाढता विस्तार

COVID-19 महामारीनंतर व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर, क्लासिक लिजेंड्सने आपली उत्पादने, अभियांत्रिकी, वितरण व्यवस्था आणि ग्राहकांना मोटरसायकलच्या मालकीचा चांगला अनुभव देणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे काम सुरू ठेवले. कंपनीचे विक्री केंद्रांचे नेटवर्कही हळूहळू विस्तारू लागले. मार्च 2019 मध्ये 77 शहरांमध्ये असलेल्या 85 डीलरशिपवरून 2026 पर्यंत संपूर्ण भारतात विक्री, सेवा आणि सुटे भाग उपलब्ध करून देणाऱ्या 450 हून अधिक केंद्रांपर्यंत हे नेटवर्क विस्तारले. त्यामुळे विशेषतः मध्यम आणि लहान शहरांमधील ग्राहकांसाठी मोटरसायकल खरेदी करणे आणि सेवा मिळवणे अधिक सोपे झाले.

2022 मध्ये, क्लासिक लिजेंड्सने येझदीला पुन्हा भारतीय रस्त्यांवर आणले आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एका खास भारतीय मोटरसायकल ब्रँडची भर घातली. येझदी स्क्रॅम्बलरच्या माध्यमातून, भारतीय रायडर्ससाठी आधुनिक स्क्रॅम्बलर प्रकार मोठ्या प्रमाणावर सादर करणाऱ्या सुरुवातीच्या ब्रँड्सपैकी क्लासिक लिजेंड्स एक ठरली. त्यामुळे मोटरसायकलचा हा वेगळा प्रकार अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचला.

क्लासिक लिजेंड्स आता अनेक ब्रँड्सचा समावेश असलेला मोटरसायकल व्यवसाय उभारत होती. प्रत्येक ब्रँडची स्वतःची वेगळी ओळख आणि आकर्षण होते. जावा आपल्या कालातीत डिझाइन, उत्कृष्ट कारागिरी आणि आधुनिक मोटरसायकल क्षेत्रात प्रत्येकाला आपले वेगळेपण जपण्याची संधी देण्यासाठी ओळखली जात होती, तर येझदीमध्ये साहस, भटकंती आणि रायडर्सच्या समुदायातून घडलेली आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती दिसून येत होती.

2024 मध्ये, BSA ने गोल्ड स्टार 650 सह भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि कंपनीच्या आधुनिक क्लासिक मोटरसायकलच्या पोर्टफोलिओमध्ये अस्सल ब्रिटिश डिझाइन, उत्कृष्ट कारागिरी आणि दमदार कामगिरीची भर घातली.

2018 मध्ये जावाच्या नवीन सुरुवातीने सुरू झालेला हा प्रवास आता 3 ब्रँड्सच्या मोटरसायकल व्यवसायापर्यंत विस्तारला आहे. या व्यवसायात वेगवेगळ्या इंजिन क्षमतेच्या मोटरसायकल्स, रायडर्सच्या आवडीनिवडी आणि विविध बाजारपेठांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये, क्लासिक लिजेंड्सने पहिल्यांदाच नफा कमावला. अनेक ब्रँड्सचा समावेश असलेला आणि दीर्घकाळ टिकणारा मोटरसायकल व्यवसाय उभारण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

व्यवसायातील महत्त्वाच्या ठळक बाबी

  • जावा येझदी आणि BSA मोटरसायकल्सच्या व्यवसायात Q1 FY27 मध्ये सुमारे 125% ची जोरदार वाढ नोंदवली गेली. यावरून व्यवसायाची सातत्यपूर्ण प्रगती आणि ग्राहकांची वाढती मागणी दिसून यते. आंतरराष्ट्रीय विक्रीचा समावेश केल्यास, FY26 मध्ये व्यवसायात 55% वाढ झाली.
  • जावा येझदी आणि BSA मोटरसायकल्सचे उद्दिष्ट FY28 पर्यंत देशभरात 700 सेवा केंद्रांपर्यंत विस्तार करण्याचे आहे. FY26 मध्ये, कंपनीने केरळमध्ये एकाच टप्प्यात 20 हून अधिक सेवा केंद्रे सुरू केली. त्यामुळे संपूर्ण भारतातील कंपनीच्या सेवा केंद्रांची संख्या 450 हून अधिक झाली असून, विशेषतः लहान आणि मध्यम शहरांमधील कंपनीची विक्री केंद्रे आणि ग्राहकांसाठीची उपलब्धता अधिक मजबूत झाली आहे.
  • जावा, येझदी आणि BSA मोटरसायकल्स विक्रीनंतरची सेवा अधिक मजबूत करण्यासाठी आणि अस्सल सुटे भाग सहज उपलब्ध व्हावेत यासाठी देशभरातील अधिकृत सुटे भाग वितरणाचे नेटवर्क विस्तारत आहेत. या उपक्रमामुळे मुख्य डीलरशिप नेटवर्कच्या बाहेरही ग्राहक, सेवा भागीदार आणि स्वतंत्र वर्कशॉप्सना अस्सल सुटे भाग उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी सेवा अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर होण्यास मदत होत आहे.
नवीन घडामोडी: FY-2027 मध्ये 4 नवीन मॉडेल्स आणण्याची योजना

क्लासिक लेजेंड्स FY27 मध्ये मोटरसायकलची 4 नवीन मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे. या नवीन मॉडेल्समुळे जावा, येझदी आणि BSA या ब्रँड्सची वेगळी ओळख अधिक मजबूत होईल. तसेच, भारतातील वाढत्या मध्यम क्षमतेच्या आणि लाइफस्टाइल मोटरसायकलच्या क्षेत्रात कंपनीची उपस्थिती आणखी वाढेल.

या नवीन मॉडेल्समुळे जावा, येझदी आणि BSA या ब्रँड्सना मिळत असलेली लोकप्रियता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, भारतातील वाढत्या मध्यम क्षमतेच्या आणि लाइफस्टाइल मोटरसायकलच्या क्षेत्रात कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत होईल.

जावाच्या नवीन सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादापासून ते येझदी आणि BSA च्या उत्पादनांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये झालेल्या विस्तारापर्यंत, क्लासिक लेजेंड्सने या 3 प्रसिद्ध नावांना आधुनिक मोटरसायकल ब्रँड्समध्ये रूपांतरित केले आहे. यापुढील प्रवास केवळ जुन्या वारशावर अवलंबून नसून, नवीन उत्पादने, अभियांत्रिकीतील प्रगती, ग्राहकांपर्यंत वाढती पोहोच आणि भारतातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारे ब्रँड्स उभारण्याच्या महत्त्वाकांक्षेवर आधारित असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जावा, येझदी आणि BSA मोटरसायकल्सची मालकी कोणाकडे आहे?

    Ans: जावा, येझदी आणि BSA या तिन्ही मोटरसायकल ब्रँड्सची मालकी महिंद्रा समूहाच्या क्लासिक लिजेंड्स कंपनीकडे आहे.

  • Que: क्लासिक लिजेंड्सच्या विक्रीत किती वाढ झाली आहे?

    Ans: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील विक्रीत सुमारे 40% वाढ झाली. आंतरराष्ट्रीय विक्रीचा समावेश केल्यास व्यवसायात 55% वाढ नोंदवली गेली.

  • Que: क्लासिक लिजेंड्स किती नवीन मोटरसायकल्स आणणार आहे?

    Ans: कंपनी FY27 मध्ये जावा, येझदी आणि BSA ब्रँड्सअंतर्गत 4 नवीन मोटरसायकल मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Jawa yezdi bsa motorcycles sales growth new bikes auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Volkswagen Virtus Facelift: 11 डिसेंबरला किंमत होणार जाहीर; नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या सेडानमध्ये मिळणार मोठे बदल!
1

Volkswagen Virtus Facelift: 11 डिसेंबरला किंमत होणार जाहीर; नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या सेडानमध्ये मिळणार मोठे बदल!

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार
2

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
3

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?
4

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.