Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Volkswagen Virtus Facelift: 11 डिसेंबरला किंमत होणार जाहीर; नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या सेडानमध्ये मिळणार मोठे बदल!

फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टची किंमत 11 डिसेंबर 2026 रोजी जाहीर होणार आहे. नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, डिजिटल डिस्प्ले आणि बदललेले डिझाइन यामुळे ही सेडान पुन्हा चर्चेत आली आहे. पण या नव्या व्हर्चसमध्ये आणखी एक खास अपडेट मिळण्याची शक्यता आहे. मागील सीटवर मसाज फंक्शन मिळणार का, याकडे आता कारप्रेमींचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 22, 2026 | 11:35 AM
Volkswagen Virtus Facelift Price Announcement (फोटो सौजन्य-AI एआय)

Volkswagen Virtus Facelift Price Announcement (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टच्या किमती 11 डिसेंबर 2026 रोजी जाहीर होणार आहेत.
  • 1.0 TSI इंजिनसोबत नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे.
  • नवीन डिजिटल डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि मागील सीट मसाज फंक्शन मिळण्याची चर्चा आहे.

भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय असलेल्या फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनी 11 डिसेंबर 2026 रोजी या नवीन सेडानच्या किमती जाहीर करणार आहे. Volkswagen Virtus Facelift 2026 मध्ये नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बाह्य डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. जून 2022 मध्ये भारतात दाखल झालेल्या या सेडानचे सुमारे साडेचार वर्षांनंतर पहिले फेसलिफ्ट येत आहे.

सध्याच्या व्हर्चसमध्ये 1.0 लिटर आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे ऑप्शन मिळतात. यातील 999cc क्षमतेचे 1.0 TSI इंजिन 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या यासोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. पण फेसलिफ्टमध्ये हा गिअरबॉक्स बदलून नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक दिला जाण्याची शक्यता आहे. हे गिअरबॉक्स फोक्सवॅगन टायगुनमध्ये एप्रिल 2026 मध्ये दाखल झाले होते. याशिवाय 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही कायम राहू शकतो.

फोक्सवॅगनच्या पार्ट्स पुरवठादाराकडून युरोपमध्ये 3,460 कर्मचाऱ्यांची कपात; 5 साइट्स बंद होणार

दुसरीकडे, 1.5 लिटर TSI इंजिन 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. यामध्ये Active Cylinder Technology असल्यामुळे कमी लोडवर इंजिनमधील 2 सिलिंडर बंद होतात आणि इंधन बचतीस मदत मिळते. या इंजिनसोबत 7-स्पीड DSG गिअरबॉक्स कायम राहण्याची शक्यता आहे.

डिझाइनच्या बाबतीत नवीन व्हर्चसमध्ये फार मोठे बदल नसले तरी काही नवीन अपडेट्स मिळतील. GT व्हेरिएंटमध्ये नवीन ब्लू रंग, ब्लॅक रूफ, ब्लॅक ORVM आणि बूट स्पॉयलर दिला आहे. पुढील बंपरमध्ये डायमंड पॅटर्न ग्रिल, LED फॉग लॅम्पसाठी नवीन जागा आणि मागील बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय 16-इंच ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स आणि लाल ब्रेक कॅलिपर्स मिळतात. पुढील बंपरवरील कॅमेरा आणि सेन्सर्समुळे 360-डिग्री कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन

केबिनमध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, इंटिग्रेटेड अॅप स्टोअर आणि Google Cloud आधारित व्हॉइस असिस्टंट मिळू शकतो. नवीन सीट अपहोल्स्ट्री आणि मागील सीटसाठी मसाज फंक्शनचीही चर्चा आहे. सध्याच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.71 लाख ते 19.20 लाख रुपये आहे. फेसलिफ्टनंतर किमतीत थोडी वाढ होऊ शकते. नवीन व्हर्चसची स्पर्धा स्कोडा स्लाव्हिया, ह्युंदाई व्हर्ना आणि होंडा सिटीशी असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टची किंमत कधी जाहीर होणार आहे?

    Ans: कंपनी 11 डिसेंबर 2026 रोजी Volkswagen Virtus Facelift च्या किमती जाहीर करणार आहे.

  • Que: नवीन फोक्सवॅगन व्हर्चसमध्ये कोणता गिअरबॉक्स मिळणार आहे?

    Ans: 1.0 TSI पेट्रोल इंजिनसोबत नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. 1.5 TSI इंजिनसोबत 7-स्पीड DSG कायम राहू शकतो.

  • Que: फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टची सध्याची किंमत किती आहे?

    Ans: सध्याच्या फोक्सवॅगन व्हर्चसची एक्स-शोरूम किंमत 10.71 लाख ते 19.20 लाख रुपये आहे. फेसलिफ्ट मॉडेलच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Volkswagen virtus facelift price launch details auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • automobile
  • digital
  • Volkswagen

संबंधित बातम्या

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार
1

मॉन्ट्रा इलेक्ट्रिकचा मोठा टप्पा! Rhino इलेक्ट्रिक ट्रकची 1,000 वी गाडी तयार

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
2

महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?
3

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा नवा धडा
4

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा नवा धडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.