
किया कार्निव्हलवर ₹1 लाख एक्सचेंज बोनस, ₹20,000 स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह आणि ₹50,000 कॉर्पोरेट डिस्काउंट अशा स्वरूपात एकूण ₹1.70 लाखांपर्यंत फायदा मिळणार आहे. आगामी हायब्रिड व्हर्जनच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या मॉडेलवर देण्यात आलेली ही ऑफर ग्राहकांसाठी आकर्षक ठरू शकते.
किया क्लॅव्हिस ICE वर एकूण ₹95,000 पर्यंत लाभ आहे. यात ₹10,000 कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज, लॉयल्टी, स्क्रॅपेज आणि कॉर्पोरेट फायदे मिळतात. क्लॅव्हिस EV वरही ₹75,000 पर्यंत विविध लाभ दिले जात आहेत. मात्र, या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये थेट कॅश डिस्काउंटचा समावेश नाही.
किया सोनेटच्या Kappa 1.2 HTK(O) व्हेरिएंटवर सर्वाधिक ₹65,000 पर्यंत फायदा मिळतो. इतर सोनेट व्हेरिएंटवर ₹50,000 पर्यंत लाभ आहे. किया सिरॉसच्या ICE व्हेरिएंटवर ₹55,000 पर्यंत आणि EV वर ₹20,000 पर्यंत फायदा मिळतो. नवीन किया सेल्टोस आणि किया सोरेंटोवर प्रत्येकी ₹40,000 पर्यंत लाभ दिला आहे.
किया कॅरेन्सच्या CNG वगळता इतर व्हेरिएंटवर ₹45,000 पर्यंत, तर CNG मॉडेलवर ₹20,000 पर्यंत स्क्रॅपेज लाभ आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व ऑफर्स ग्राहकाची पात्रता, व्हेरिएंट आणि डीलरनुसार बदलू शकतात. त्यामुळे कार खरेदीपूर्वी जवळच्या किया डीलरशी संपर्क करून अंतिम ऑफर आणि उपलब्धता तपासणे योग्य ठरेल.