
किया इंडियाने भारतीय बाजारात आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा विस्तार करत ‘Kia Carnival Hybrid’ चे लिमोझिन व्हर्जन अधिकृतपणे सादर केले आहे. ऑल-न्यू सोरेंटो आणि केरेन्स CNG सोबत प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ही लक्झरी हायब्रिड MPV येत्या काही महिन्यांत ऑफीशली लाँच केली जाईल. लक्झरी, मोठा आकार आणि उत्तम मायलेजचा मेळ घालणाऱ्या या कारमुळे भारतीय लक्झरी एमपीव्ही सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
दमदार हायब्रिड इंजिन आणि परफॉर्मन्स
Kia Carnival Hybrid मध्ये १.६-लिटर टर्बोचार्ज्ड जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे १८० PS ची कमाल पॉवर आणि २६५ Nm चा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ७३.४ PS पॉवर आणि ३०४ Nm टॉर्क निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरची साथ देण्यात आली आहे. जागतिक बाजारात हे हायब्रिड इंजिन एकत्रितपणे २४५ PS ची पॉवर आणि ३६८ Nm चा प्रचंड टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला असून पॉवर फ्रंट-व्हील्सकडे पाठवली जाते. हायब्रिड सिस्टीममुळे या विशाल एमपीव्हीच्या मायलेजमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
भव्य आकार आणि आकर्षक लूक
चौथ्या जनरेशनवर आधारित ही कार्निव्हल आकाराच्या बाबतीत अत्यंत भव्य आहे. या कारची लांबी ५,१५६ मिमी, रुंदी १,९९४ मिमी, उंची १,७४० मिमी आणि व्हीलबेस ३,०९१ मिमी इतका मोठा आहे. डिझाइनचा विचार केल्यास, यात कियाची नवीन ‘टायगर नोज’ ग्रिल, व्हर्टिकल एलईडी हेडलॅम्प्स, कनेक्टेड एलईडी डीआरएल, १८-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस सोयीस्कर इलेक्ट्रिक स्लाइडिंग डोअर्स देण्यात आले आहेत. तिचा लांब बोनेट आणि उंच काच यामुळे हिला खऱ्या अर्थाने एक प्रीमियम लूक मिळतो.
हाय-टेक इंटीरियर आणि केबिन फीचर्स
कारच्या केबिनमध्ये तंत्रज्ञान आणि कम्फर्टवर विशेष भर देण्यात आला आहे. यात ७ आणि ८-सीटर लेआउटचा पर्याय उपलब्ध असेल. १२.३-इंच चे दोन डिजिटल स्क्रीन (इन्फोटेनमेंट व ड्रायव्हर डिस्प्ले) आणि ११-इंच चा हेड-अप डिस्प्ले. दुसऱ्या रांगेत पॉवर्ड ‘रिलॅक्सेशन सीट्स’ ज्यामध्ये हिटिंग, व्हेंटिलेशन, रिक्लाइनिंग आणि व्हेन्टिलेटेड ऑटोमन सपोर्ट समाविष्ट आहे. बोस ऑडिओ सिस्टीम, ड्युअल सनरूफ, ट्रिपल-झोन क्लायमेट कंट्रोल, किया कनेक्ट आणि डिजिटल रिअर-व्ह्यू मिरर.
पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
सेफ्टी फीचर्स आणि ADAS
सुरक्षेच्या बाबतीत कियाने यात सुरक्षेचे आंतरराष्ट्रीय निकष पाळले आहेत. यात ८ एअरबॅग्ज, चारही चाकांना डिस्क ब्रेक, फ्रंट, रिअर आणि साईड पार्किंग सेन्सर्स, TPMS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल-स्टार्ट असिस्ट मिळतात. याशिवाय, यात Level 2 ADAS देण्यात आला आहे; ज्यामध्ये फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स, लेन कीप असिस्ट, ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग आणि सेफ-एक्झिट असिस्ट यांसारखी आधुनिक सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत.