
किया इंडियाने नोव्हेंबरमध्ये २५,४८९ युनिट्सची विक्री केली
वार्षिक २४ टक्के वाढीसह आतापर्यंतच्या सर्वोच्च कामगिरीची नोंद
२०२४ मधील विक्रीपेक्षा यंदा 24 टक्क्यांनी वाढ
किया इंडिया ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी आधुनीच फीचर्स आणि सुविधा असणारी वाहने किया (Kia)कंपनी सातत्याने लॉंच करत असते. भारतीय बाजारपेठेत यंदा किया इंडिया कंपनीने तुफानी विक्री केली आहे. आपला मागच्याच वर्षीचा रेकॉर्ड किया इंडिया कंपनीने मोडला आहे. किया इंडिया कंपनीने नोव्हेंबर महिन्यात हजारो गाड्यांची विक्री केली आहे.
किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकरने भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून नोव्हेंबरमध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रीची नोंद केली आहे. २५,४८९ युनिट्सची विक्री करत कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये विक्री करण्यात आलेल्या २०,६०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक २४ टक्के मोठी वाढ संपादित केली. या कामगिरीचे श्रेय ऑक्टोबर २०२५ मध्ये कियाने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रीला जाते, ज्यासह ब्रँडची स्थिर विकास गती अधिक प्रबळ होत आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून ग्राहकांमध्ये कियाच्या पोर्टफोलिओसाठी उच्च मागणी आणि वर्षभर ब्रँडची स्थिर गती दिसून येते. सणासुदीच्या काळानंतर देखील मोठी मागणी आणि प्रबळ रिटेल परिसंस्थेच्या पाठिंब्यासह किया इंडियाची वायटीडी देशांतर्गत विक्री गेल्या वर्षीच्या २३६,०४३ युनिट्सच्या तुलनेत २६१,६२७ युनिट्सपर्यंत वाढली आहे. श्रेणीमध्ये अत्यंत स्पर्धा असताना देखील किया सोनेटला लोकप्रियता मिळत राहिली, जेथे गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली आणि ब्रँडसाठी सर्वात मोठा विकास स्रोत म्हणून उदयास आली. नुकतेच जीएसटी दरामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनी सोनेटसाठी मागणी अधिक वाढवली आहे, ज्यासह अलिकडील महिन्यांमध्ये ब्रँडची प्रबळ कामगिरी अधिक दृढ झाली आहे. दरम्यान, इतर मॉडेल्स जसे सेल्टोस, सिरॉस, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही यांना देखील बाजारपेठेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री
या यशाबाबत मत व्यक्त करत किया इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, ”नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च कामगिरीमधून भारतातील ग्राहकांमध्ये कियाप्रती वाढती लोकप्रियता दिसून येते. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मागणीला गती मिळण्यासोबत आमच्या उत्पादनांना प्राधान्य दिले जात असल्याचे देखील दिसून आले. सहाय्यक धोरण आणि गतीशीलता पायाभूत सुविधेमध्ये त्वरित सुधारणा श्रेणींमध्ये खरेदीबाबत आत्मविश्वास वाढवत आहेत. कियामध्ये आम्ही प्रीमियम गतीशीलता अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत, जे भारतीयांच्या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांशी संलग्न आहेत.”
हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट
ग्राहकांच्या डिझाइन,तंत्रज्ञान व सुरक्षितता यांसंदर्भातील विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोर्टफोलिओसह किया इंडिया आपले मास-प्रीमियम नेतृत्व अधिक प्रबळ करत आहे. ब्रँड उर्वरित वर्षामध्ये आणि २०२६ मध्ये ही विकास गती कायम ठेवण्यास उत्तमरित्या स्थित आहे. किया इंडियाने या महिन्यादरम्यान ३००४ युनिट्स निर्यात केले, ज्यासह २०२५ साठी इअर-टू-डेट (वायटीडी) निर्यात २५,२७९ युनिट्सपर्यंत पोहोचली. यामधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ब्रॅडची सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते.