
तुम्हाला माहीत आहेत का वाहतुकीचे नियम (फोटो सौजन्य - ChatGPT)
पण सामन्या नागरीक म्हणून तुम्हाला याबाबत माहिती आणि तुमच्या अधिकाराबाबत जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अशा घटना होतात तेव्हा Motor Vehicle Act नक्की आपल्याला कोणता अधिकार सांगतो हेच आज आपण जाणून घेऊया.
या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा कोणताही हक्क कायद्याने दिलेला नाही. Motor Vehicle Act 1998 च्या कोणत्याही कायद्यांतर्गत असा कोणताही नियम नाही की, वाहतूक अधिकारी वा पोलीस तुमच्या कार वा बाईकची चावी काढून घेऊ शकतो. असं कोणत्याही अधिकाऱ्याने केल्यास ते बेकायदेशीर असल्याचं मानलं जातं.
तपासणीदरम्यान पोलीस अधिकारी आपल्या हाताने इशारा करत गाडी थांबविण्याचा सिग्नल देऊ शकतात अथवा बॅरिअर लाऊ शकतात. तसंच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसीसारखे योग्य कागदपत्र नसतील, तुम्ही दारूच्या नशेत बाईक वा कार चालवत असाल वा गाडी चोरी झाल्याचा संशय असेल तर या नियमान्वये वाहतूक पोलीस तुम्हाला थांबवू शकतात वा तुमचा गाडी जप्त करू शकतात. पण या दरम्यान पोलीस तुम्हाला एक रिसीट वा चलान देतात, चावी काढून घेणं हे कोणत्याही कायद्यात बसत नाही.
Buldhana: ‘एचएसआरपी’ नसलेल्या ७४० वाहनांवर कारवाई; ५७ हजाराचा दंड वसूल; परिवहन विभागाची मोहीम
नाही, वाहतूक पोलीस तुमच्याकडचा मोबाईल काढून घेऊ शकत नाहीत. असा कोणताही अधिकार कायद्यानुसार त्यांना नाही. मोबाईल फोन हा तुमची खासगी मालमत्ता असून त्यामध्ये प्रत्येकाची खासगी माहिती असते. कोणत्याही ठोस कायद्याच्या पुराव्याशिवाय वा वॉरंटशिवाय पोलीस तुमच्या मोबाईलला हात लाऊ शकत नाहीत. तसंच मोबाईल तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आणि तुमचा फोन अनलॉकही करू शकत नाहीत.
जर कोणताही पोलीस अधिकारी गैरवर्तन करत असेल, लाच मागत असेल किंवा तुमच्या गाडीच्या चाव्या बेकायदेशीरपणे काढून घेत असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. पोलीस तुम्हाला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून रोखू शकत नाहीत, किंवा ते तुमचा फोन जप्तही करू शकत नाहीत. तथापि, हे सुनिश्चित करणे देखील महत्त्वाचे आहे की व्हिडिओ रेकॉर्ड करताना, तुम्ही पोलिसांच्या अधिकृत कामात हस्तक्षेप करू नये, किंवा त्यांच्याशी वाद घालू नये किंवा झटापट करू नये.
जर तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला, तर घाबरू नका आणि खालील पायऱ्यांचे पालन करा:
तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत ॲप्स ‘डिजीलॉकर’ (DigiLocker) किंवा ‘एमपरिवहन’ (mParivahn) मध्ये जतन केलेली डीएल (DL), आरसी (RC), विमा इत्यादी पूर्णपणे वैध असलेली डिजिटल कागदपत्रे दाखवू शकता.