फोटो सौजन्य: Social media
जगभरात ज्याप्रमाणे कार्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याचप्रमाणे पिकअप ट्रकचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ऑटो कंपनीज सध्या पिकअप ट्रक लाँच करत आहे. आता दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी किआ मोटर्स जगातील अनेक देशांमध्ये सर्वोत्तम कार, एमपीव्ही आणि एसयूव्ही ऑफर करते.
नुकतेच कंपनीने Kia Tasman हा आपला पहिला पिकअप ट्रक म्हणून जागतिक स्तरावर सादर केला आहे. पिकअप ट्रक कोणत्या क्षमतेचा आहे. याला भारतीय बाजारपेठेतही आणता येईल का? या प्रश्नांची उत्तरे आज आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली Hyundai Creta EV, मिळाली अनेक फीचर्सची माहिती
ज्यांना ऑफ-रोडिंग आवडते त्यांच्यासाठी Kia ने Kia Tasman पिक-अप ट्रक हा नवीन पर्याय म्हणून सादर केला आहे. यामुळे कच्चा रस्त्यावर उत्तम रायडींगचा अनुभव चालकाला मिळणार आहे.
या ट्रकला कियाने मस्क्युलर लूक दिला आहे. यासोबतच यात 17 इंच ग्लॉस ब्लॅक ऑल टेरेन टायर देण्यात आले आहेत. याशिवाय 18 इंच टायरचा पर्यायही यामध्ये मिळेल. यासोबतच यात 12.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, HVAC कंट्रोलसाठी पाच इंची स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, मोठा फोल्डिंग कन्सोल टेबल, ड्युअल वायरलेस चार्जिंग सुविधा, ADAS, लेन कीप असिस्ट, रिमोट पार्किंग असिस्ट , सर्व ड्राइव्ह क्षमता तसेच 800 मिमी वॉटर वेडिंग क्षमता यासारख्या अनेक फीचर्स आहेत.
कंपनीने एकूण तीन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणून २.२ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. यामुळे त्याला 210 हॉर्स पॉवर आणि 441 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. याशिवाय, तिसरे इंजिन म्हणून याला आणखी एका इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे, यात 2.5 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे ते 281 अश्वशक्ती आणि 421 न्यूटन मीटर टॉर्क देईल. एसयूव्हीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
हे देखील वाचा: 10 लाखाच्या कार्सच्या विक्रीला लागली उतरती कळा, मारुतीच्या चेअरमननी सांगितले कारण
कंपनीने हा ट्रक जागतिक स्तरावर सादर केले आहे. पण हा ट्रक आधी फक्त काही देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक सर्वप्रथम दक्षिण कोरियामध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये आणले जाईल. हा ट्रक सध्या भारतीय बाजारात लाँच केला जाणार नाही आहे. पण अशी अपेक्षा आहे की टोयोटा हिलक्स आणि इसुझू व्ही-क्रॉस सारख्या पर्यायांची मागणी वाढल्याने Kia देखील लवकरच हा पिकअप ट्रक भारतात आणू शकेल.