
Kia Seltos Scores Five Stars In Euro NCAP Crash Test (फोटो सौजन्य-AI एआय)
किआ सेल्टॉस या लोकप्रिय SUV ने 2026 Euro NCAP Crash Test मध्ये 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. या चाचणीत SUV ला Post Crash Safety मध्ये 90 टक्के आणि Occupant Protection मध्ये 84 टक्के गुण मिळाले आहेत. पण पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या चाचणीत काही भागांना कमी गुण मिळाल्याने या निकालाची चर्चा सुरू झाली आहे.
युरोपियन बाजारासाठी तयार करण्यात आलेल्या लेफ्ट हँड ड्राइव्ह किआ सेल्टॉस 1.6T 6DCT 2WD मॉडेलची ही चाचणी घेण्यात आली. या कारचे वजन 1,490 किलो होते. विशेष म्हणजे, हे रेटिंग युरोपियन स्पेसिफिकेशनच्या मॉडेलला लागू आहे. त्यामुळे भारतात विकल्या जाणाऱ्या सेल्टॉसला हेच सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, असे समजणे चुकीचे ठरेल.
अपघातानंतरच्या सुरक्षेत 90 टक्के गुण
Euro NCAP च्या नव्या चाचणी पद्धतीत अपघात झाल्यानंतर प्रवासी आणि बचाव पथकाला मिळणाऱ्या मदतीचीही तपासणी केली जाते. या विभागात सेल्टॉसने 90 टक्के गुण मिळवले. अपघातानंतर कार आपोआप ब्रेक लावून दुसरी धडक टाळण्याचा प्रयत्न करते. तसेच इमर्जन्सी कॉल सिस्टीममधून अपघाताची माहिती बचाव पथकापर्यंत पोहोचवली जाते. बचावासाठी लागणारी माहिती, धोक्याचा इशारा आणि प्रवाशांना बाहेर काढण्याच्या सुविधांना पूर्ण गुण मिळाले.
प्रवाशांच्या सुरक्षेत चांगले गुण
क्रॅश प्रोटेक्शनमध्ये सेल्टॉसला 84 टक्के गुण मिळाले. साइड इम्पॅक्ट चाचणीत सर्व महत्त्वाच्या शरीराच्या भागांना चांगले संरक्षण मिळाले. पण समोरून होणाऱ्या धडकेत ड्रायव्हरच्या छातीला मध्यम संरक्षण, तर पुढच्या प्रवाशाच्या छातीला कमकुवत संरक्षण मिळाले. साइड पोल इम्पॅक्टमध्येही ड्रायव्हरच्या छातीच्या सुरक्षेत काही मर्यादा दिसल्या. सेंटर एअरबॅगमुळे पुढील दोन्ही प्रवाशांमधील धडक टाळण्यास मदत झाली.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेत काही कमकुवत बाजू
पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या चाचणीत पेल्विस म्हणजेच कंबरेच्या भागाला फक्त 5 टक्के गुण मिळाले. गुडघे आणि पायाच्या खालच्या भागासाठी 85 टक्के, तर मांडीसाठी 80 टक्के गुण मिळाले. क्रॅश अव्हॉइडन्समध्ये 71 टक्के आणि सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये 67 टक्के गुण मिळाले. त्यामुळे 5 स्टार रेटिंग मिळूनही पादचारी सुरक्षा आणि काही अपघात टाळणाऱ्या सिस्टीममध्ये सुधारणा करण्यास वाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: 2026 च्या Euro NCAP सुरक्षा चाचणीत युरोपियन स्पेसिफिकेशनच्या किआ सेल्टॉसला 5 स्टार मिळाले आहेत.
Ans: अपघातानंतरच्या सुरक्षेच्या म्हणजेच Post Crash Safety विभागात या SUV ला 90 टक्के गुण मिळाले. प्रवाशांच्या संरक्षणात 84 टक्के गुण मिळाले.
Ans: या चाचणीचा निकाल युरोपियन स्पेसिफिकेशनच्या लेफ्ट हँड ड्राइव्ह मॉडेलसाठी आहे. त्यामुळे भारतात विकल्या जाणाऱ्या सेल्टॉसला हेच रेटिंग मिळाले आहे, असे म्हणता येणार नाही. भारतातील मॉडेलचे स्वतंत्र क्रॅश टेस्ट निकाल तपासणे आवश्यक आहे.