
फोटो सौजन्य: Pinterest
बेस मॉडेलचा विचार केला तर, किआ सेल्टोस अधिक परवडणारी असल्याचे सिद्ध होते. सेल्टोसच्या HTE पेट्रोल व्हेरिएंटची किंमत सुमारे 10.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर टाटा सिएराच्या Smart Plus पेट्रोल व्हेरिएंटची किंमत सुमारे 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. याचा अर्थ असा की सेल्टोस 50 हजारांनी स्वस्त आहे.
अखेर New Kia Seltos च्या किमतीबाबत खुलासा! किंमत फक्त ‘इतक्या’ लाख रूपयांपासून सुरु
दोन्ही एसयूव्ही पेट्रोल इंजिनसह येतात. किआ सेल्टोसमध्ये 1497cc पेट्रोल इंजिन आहे, तर टाटा सिएरामध्ये 1498cc सीसी पेट्रोल इंजिन आहे. दोन्ही वाहने बेस मॉडेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतात. परफॉर्मन्सच्या बाबतीत, दोन्हीही सुरळीत ड्रायव्हिंग आणि दैनंदिन वापरण्यावर लक्ष केंद्रित करतात.
दोन्ही कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. बेस व्हेरिएंटमध्ये एअरबॅग्ज, ABS आणि इतर सिस्टीम सारख्या आवश्यक स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स मिळतात. मात्र, टॉप व्हेरिएंटमध्ये, किआ सेल्टोस लेव्हल-2 एडीएएस आणि 360-डिग्री कॅमेरा सारख्या प्रगत तंत्रज्ञानासह येते, जे टाटा सिएरा त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये देखील समाविष्ट करते.
किआ सेल्टोस बेस मॉडेलमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येते. टाटा सिएराच्या स्मार्ट प्लस व्हेरियंटमध्ये स्क्रीनचा आकार थोडा मोठा असू शकतो, परंतु सेल्टोस त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप आणि अधिक टेक फीचर्ससह आघाडीवर आहे. सेल्टोस अधिक तंत्रज्ञान प्रेमींना आकर्षित करू शकते.
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI
जर तुमच्यासाठी जागा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, तर Tata Sierra या तुलनेत स्पष्टपणे आघाडीवर ठरते. Sierra मध्ये सुमारे 622 लिटरचा मोठा बूट स्पेस मिळतो, तर Kia Seltos मध्ये 433 लिटरचा बूट स्पेस उपलब्ध आहे. त्यामुळे मोठे कुटुंब असो किंवा जास्त सामान घेऊन प्रवास करण्याची गरज असो, Sierra अधिक व्यवहार्य पर्याय ठरू शकते.
नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनच्या बाबतीत Kia Seltos ची किंमत 10.99 लाख ते 19.49 लाख रुपयांदरम्यान आहे, तर Tata Sierra ची किंमत 11.49 लाख ते ₹17.99 लाख रुपयांइतकी आहे. टर्बो पेट्रोल सेगमेंटमध्ये Seltos ची किंमत 12.89 लाख ते 19.99 लाख दरम्यान असून, Sierra ची किंमत 17.99 लाख ते ₹20.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
डिझेल पर्यायात, Kia Seltos ची किंमत 12.59 लाख ते 19.99 लाख रुपये आहे, तर Tata Sierra साठी डिझेल व्हेरिएंटची किंमत 12.99 लाख ते 21.29 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.