फोटो सौजन्य: Pinterest
भारतात अनेक लोकप्रिय SUV वाहने आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Honda Elevate. जर या कारच्या बेस व्हेरिएंटसाठी तुम्ही 1 लाखाचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
January 2026 मध्ये ‘या’ एकपेक्षा एक सरस कार लाँच होण्याच्या रांगेत, जाणून घ्या संपूर्ण यादी
होंडा एलिव्हेट एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट म्हणून SV ऑफर करते . कंपनी या मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देते. कार खरेदी करताना तुम्हाला 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ शुल्क भरावे लागतील. आरटीओसाठी 1.19 लाख रुपये, विम्यासाठी सुमारे 41 हजार रुपये भरावे लागतील. टीसीएस शुल्क म्हणून 10999 रुपये देखील द्यावे लागतील. त्यानंतर या कारची ऑन-रोड किंमत 12.77 लाख रुपये होईल.
जर तुम्ही Honda Elevate SUV चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीइतकेच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 11.77 लाख रुपये बँकेतून कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेकडून तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.77 लाख रुपये कर्ज मंजूर झाले, तर पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 19,138 रुपयांचा EMI भरावा लागेल.
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.77 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत दरमहा 19138 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही सुमारे 4.30 लाख रुपये फक्त व्याज भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Honda Elevate च्या बेस व्हेरिएंटसाठी एकूण खर्च सुमारे 17.07 लाख रुपये इतका होईल.






