Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kinetic Luna: चल मेरी लुना! स्ट्राँग बॉडी आणि 110 किमी रेंज देणारी कायनेटिक ई-लुना लाँच; जाणून घ्या डिटेल्स

Kinetic Green brings: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्‍समधील अग्रणी कंपनीने ई-लुनासाठी नवीन टेलिव्हिजन कॅम्‍पेन लाँच केली आहे. काय आहे या गाडीची वैशिष्ट्ये...

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2025 | 04:35 PM
चल मेरी लुना! स्ट्राँग बॉडी आणि 110 किमी रेंज देणारी कायनेटिक ई-लुना लाँच; जाणून घ्या डिटेल्स

चल मेरी लुना! स्ट्राँग बॉडी आणि 110 किमी रेंज देणारी कायनेटिक ई-लुना लाँच; जाणून घ्या डिटेल्स

Follow Us
Close
Follow Us:

Kinetic Green News Marathi:कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्‍समधील अग्रणी कंपनीने ई-लुनासाठी नवीन टेलिव्हिजन कॅम्‍पेन लाँच केली आहे. प्रसिद्ध व कालातील ‘चल मेरी लुना’ टॅगलाइनच्‍या जुन्‍या आठवणींमध्‍ये खोलवर रूजलेली ही मोहिम शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये नवीन पैलूची भर करते, तसेच नाविन्‍यता आणि वैयक्तिक प्रवासाप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ करते.

भारतीयांसाठी किफायतशीर, व्‍यावहारिक व इंधन-कार्यक्षम दुचाकी म्‍हणून दर्जा मिळवलेल्‍या, तसेच त्‍यांना कोणत्‍याही विनासायास वैयक्तिक प्रवासाचा आनंद देणाऱ्या पूर्वीच्‍या मॉडेलप्रमाणे ई-लुनामध्‍ये देखील तेच पैलू सामावलेले आहेत, पण आता इलेक्ट्रिसिटी आणि आधुनिक उच्‍च-सतरीय तंत्रज्ञानाची शक्‍ती समाविष्‍ट करण्‍यात आली आहे. ऑल-इलेक्ट्रिक दुचााकी ई-लुना भारतातील शहरी व ग्रामीण भागांमधील प्रवाशांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि किफायतशीर गतीशीलता सोल्‍यूशन देते.

Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद, कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री

ई-लुना ऑल-इलेक्ट्रिक दुचाकी असल्‍यामुळे या मोहिमेमध्‍ये दाखवण्‍यात आलेल्‍या प्रमुख पैलूंमध्‍ये बॅटरीच्‍या सिंगल चार्जमध्‍ये लांब अंतरापर्यंतची रेंज, दैनंदिन प्रवासासाठी सोल्‍यूशन म्‍हणून तिची विविधता आणि तिची जड सामान वाहून देण्‍याची क्षमता यांचा समावेश आहे. ज्‍यामुळे ही इलेक्ट्रिक वेईकल भारतातील रस्‍त्‍यांवर राइड करण्‍यासाठी आणि कार्यसंचालन स्थितींसाठी अनुकूल आहे. ही मोहिम इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या (ईव्‍ही) पर्यावरणीय फायद्यांवर भर देते, तसेच ई-लुनाला शहरी व ग्रामीण गतीशीलता आवश्‍यकतांसाठी स्‍मार्ट आणि वैविध्‍यपूर्ण सोल्‍यूशन म्‍हणून स्थित करते.

ई-लुनाची खासियम म्‍हणजे तिची प्रभावी लांब अंतरापर्यंतची क्षमता, जेथे २.३ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी क्षमतेसह सिंगल चार्जमध्‍ये जवळपास ११० किमीची रेंज देते. २.२ केडब्‍ल्‍यू सर्वोच्‍च क्षमतेसह उच्‍च-कार्यक्षम बीएलडीसी मिड-माऊंट मोटरची शक्‍ती असलेली ई-लुनाची अव्‍वल गती ५० किमी/तास आहे, ज्‍यामुळे आंतरशहरी व अर्ध-शहरी वाहतूकीमधून प्रवास करण्‍यासाठी ती परिपूर्ण आहे. या वेईकलमधील आयपी-६७ प्रमाणित बॅटरी, मोटर आणि कंट्रोलर टिकाऊपणाची खात्री देतात, ज्‍यामुळे पाणी व धूळीपासून संरक्षण होते आणि भारतातील विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्‍ये सुधारित कार्यक्षमतेची खात्री मिळते.

तसेच, ई-लुनामध्‍ये शक्तिशाली ड्युअल-ट्यूबलर, उच्‍च क्षमतेचे स्‍टील चेसिस आहे, जे टिकाऊपणा व स्थिरतेमध्‍ये वाढ करतात, तसेच प्रीमियम मोटरसायकल्‍सच्‍या समकालीन आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात. विविध कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या वेईकलमध्‍ये १५० किलो पेलोड क्षमता आहे, ज्‍यामुळे वैयक्तिक प्रवास व व्‍यवसाय उपयोजनेसह लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी सेवांसाठी अनुकूल आहे.

ई-लुनामध्‍ये एकीकृत करण्‍यात आलेल्‍या स्‍मार्ट तंत्रज्ञानामध्‍ये सीएएन-सक्षम कम्‍युनिकेशन्‍स प्रोटोकॉल, डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेन्‍टेशनसह रिअल-टाइम ‘डिस्‍टन्‍स टू एम्‍प्‍टी’ इंडिकेटर्स आणि सानुकूल रेंज कार्यक्षमतेसाठी विविध राइडिंग मोड्स आहेत. सुरक्षितता आणि सोयीसुविधा वैशिष्‍ट्यांमध्‍ये कॉम्‍बी-ब्रेकिंग सिस्‍टम, टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट सस्‍पेंशन, उच्‍च दर्जाच्‍या स्थिरतेसाठी मोठे १६-इंच व्‍हील्‍स, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सुधारित स्थिरतेसाठी डिटॅचेबल रिअर सीट आणि राइडरला अधिक सुविधा म्‍हणून साइड स्‍टॅण्‍ड सेन्‍सर यांचा समावेश आहे.

ई-लुना पूर्णपणे भारतात डिझाइन, रचना व उत्‍पादित करण्‍यात आली आहे, जी देशामध्‍ये ईव्‍ही अवलंबतेचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या कायनेटिक ग्रीनच्‍या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही वेईकल किफायतशीर व हरित उत्‍सर्जन-मुक्‍त राइडिंग अनुभव देते, व्‍यक्‍ती आणि उद्योगांच्‍या गरजांची पूर्तता करते. प्रगत तंत्रज्ञान, नाविन्‍यपूर्ण डिझाइन आणि मल्‍टी-युटिलिटी कार्यक्षमतेसह ई-लुनाने इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले आहेत, जिच्‍यामध्‍ये कार्यक्षमता, परफॉर्मन्‍स व शाश्‍वततेचे एकत्रिकरण आहे.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुलज्‍जा फिरादिया मोटवानी म्‍हणाल्‍या, “ही मोहिम लुनाच्‍या प्रख्‍यात वारशाला साजरी करते, तसेच ई-लुनाला वैयक्तिक गतीशीलतेचे भविष्‍य म्‍हणून स्‍थापित करते. ई-लुना इलेक्ट्रिक दुचाकी असण्‍यासोबत प्रगती, शाश्‍वतता आणि नाविन्‍यतेचे प्रतीक आहे. भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या वेईकलमध्‍ये कार्यक्षमता, टिकाऊपणा व किफायतशीरपणा सामावलेला आहे, ज्‍यामुळे शहरामध्‍ये आणि ग्रामीण भागांत वापरासाठी ही अनुकूल आहे. प्रबळ वैशिष्‍ट्ये, अपवादात्‍मक रेंज आणि स्‍मार्ट तंत्रज्ञानासह ई-लुना समकालीन जीवाश्‍म इंधन-आधारित दुचाकींऐवजी शक्तिशाली, व्‍यावहारिक व पर्यावरणपूरक पर्याय देत ईव्‍ही बाजारपेठेत क्रांती घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. आमचा ई-लुनाला व्‍यक्‍ती व व्‍यवसायांसाठी प्रगतीमधील सहयोगी बनवण्‍याचा मनसुबा आहे, जेथे देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत इलेक्ट्रिक गतीशीलतेचे फायदे पोहोचण्‍याची खात्री घेण्‍यात येईल.”

आयकॉनिक‘चल मेरी लुना’ टॅगलाइनवर डिझाइन करण्‍यात आलेली मोहिम आधुनिक सुधारणांसह जुन्‍या आठवणींना कलात्‍मकरित्‍या सादर करते, तसेच सर्वसमावेशक इलेक्ट्रिक युगाशी संलग्‍न राहत कालातीत टॅगलाइनला नवीन रूप देते. ही मोहिम ई-लुनाचे प्रगत तंत्रज्ञान, व्‍यावहारिकता आणि पर्यावरणपूरक कार्यक्षमतेला दाखवते, तसेच मूळ लुनाच्‍या साधेपणा व विश्‍वसनीयतेच्‍या वारसाला सन्‍मानित करते. विविध ग्राहकांशी संलग्‍न होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही मोहिम दाखवून देते की, ई-लुनाने आजच्‍या युगात समर्पक व अर्थपूर्ण वारसा कायम ठेवला आहे. मूळ ‘चल मेरी लुना’ मोहिमेप्रमाणे नवीन मोहिमेचे नेतृत्‍व देखील जाहिरात दिग्‍गज ओ‍गील्‍व्‍ही ग्रुपचे पियुष पांडे यांनी केले आहे. नवीन मोहिम देखील जुन्‍या मोहिमेप्रमाणे तीन नवीन टेलिव्हिजन जाहिरातींना सादर करेल. या नवीन मोहिमेचा विनोदासह प्रेक्षकांसोबत भावनिक नाते निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.

ओगील्‍व्‍ही ग्रुपसाठी प्रमुख सल्‍लागार पियुष पांडे म्‍हणाले, “आधुनिक ट्विस्‍टसह लुना ब्रँडला नवीन रूप देण्‍याचे ग्रुपसाठी आव्‍हान होते, तसेच विशेषाधिकार देखील होता. आमच्‍या ‘चल मेरी लुना’ मोहिमेने लुनाला संपूर्ण पिढीसाठी सांस्‍कृतिक आयकॉन ‘सफलता की सवारी’ बनवले. आता, अरूण फिरोदिया यांची मुलनी सुलज्‍जा फिरोदिया हा वारसा पुढे घेऊन जात आहेत. ई-लुनासाठी नवीन मोहिम ८२.५ कम्‍युनिकेशन्‍सने डिझाइन केली आहे, जी ओगील्‍व्‍ही ग्रुपची भाग आहे आणि यामध्‍ये तीन हलक्‍या-फुलक्‍या, संस्‍मरणीय टीव्‍हीसींच्‍या माध्‍यमातून जुन्‍या आठवणी आणि आधुनिक गतीशीलतेचे संयोजकन करण्‍यात आले आहे. ८२.५ मध्‍ये आमच्‍या टीममसाठी या फक्‍त जाहिराती नाहीत तर लुनाच्‍या क्रांतीप्रती मानवंदना आणि तिच्‍या प्रवासामधील उत्‍साहवर्धक नवीन अध्‍याय आहे.”

८२.५ कम्‍युनिकेशन्सचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर मयूर वर्मा म्‍हणाले, “ई-लुना इलेक्ट्रिक आहे. ई-लुना स्‍ट्रीट-स्‍मार्ट आहे. ई-लुना भारतातील हसलर्ससाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. संवाद सांस्‍कृतिक ट्रेण्‍ड्सवर निर्माण केल्‍या जाणाऱ्या काळात चल मेरी लुना भारतातील कालातीत सांस्‍कृतिक मेगाट्रेण्‍ड आहे आणि लुना ई-अवतारामध्‍ये परत येत असल्‍यामुळे या मेगाट्रेण्‍डबाबत समकालीन गाथा सांगण्‍याची वेळ आली आहे.”

२०२४ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या ई-लुनाने इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेवर प्रबळ प्रभाव निर्माण केला आहे, जेथे भारतातील रस्‍त्‍यांवर २५,००० हून अधिक युनिट्स राइड करत आहेत. या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून शाश्‍वत व व्‍यावहारिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍ससाठी वाढती मागणी दिसून येते. या गतीला अधिक पुढे घेऊन जात कायनेटिक ग्रीन आक्रमक विपणन धोरणाच्‍या या विकासाला अधिक चालना देण्‍यास सज्‍ज आहे, जेथे कंपनीच्‍या व्‍यापक उत्‍पादन क्षमता आणि भारतभरात असलेल्‍या ५०० हून अधिक ग्राहक टचपॉइण्ट्सच्‍या स्‍थापित डिलर फूटप्रिंटचा फायदा घेण्‍यात येईल. या प्रबळ मुलभूत पैलूंमधून देशभरातील ग्राहकांना उत्तम उपलब्‍धता, उद्योग-अग्रणी दर्जात्‍मक उत्‍पादने आणि सकारात्‍मक मालकीहक्‍क अनुभवाची खात्री मिळेल.

किती डाउन पेमेंट केल्यास Maruti Baleno होईल तुमच्या नावावर? असं आहे EMI चं गणित

Web Title: Kinetic green brings back chal meri luna legacy with a modern twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • automobile news
  • electric bike

संबंधित बातम्या

Autonomous Three Wheeler: जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतात लाँच, किंमत फक्त…
1

Autonomous Three Wheeler: जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतात लाँच, किंमत फक्त…

शोरूमसारखी चकचकीत बाईक हवी आहे? रोजच्या ‘या’ चुका टाळा आणि फॉलो करा ‘या’ टिप्स
2

शोरूमसारखी चकचकीत बाईक हवी आहे? रोजच्या ‘या’ चुका टाळा आणि फॉलो करा ‘या’ टिप्स

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
3

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

Nissan ची नवी SUV बाजारात आणणार ‘तुफान’, ऑक्टोबरमध्ये मोठी घोषणा; Creta Seltos ला आव्हान
4

Nissan ची नवी SUV बाजारात आणणार ‘तुफान’, ऑक्टोबरमध्ये मोठी घोषणा; Creta Seltos ला आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.