Honda Elevate ला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद कंपनीने ‘या’ कारची केली रेकॉर्ड ब्रेक विक्री (फोटो सौजन्य-X)
Honda Cars: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने जागतिक एसयूव्ही मॉडेल होंडा एलीव्हेटच्या एकूण १ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे, जेथे ही कार देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्यंत यशस्वी ठरली आहे. एलीव्हेट मेड इन इंडिया असून सध्या तापुकारा, राजस्थान येथील एचसीआयएलच्या उत्पादन प्लांटमध्ये उत्पादित केली जात आहे. कंपनीने भारतात एलीव्हेटच्या एकूण ५३,३२६ युनिट्सची विक्री केली आहे आणि जानेवारी’२५ पर्यंत जपान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ व भूतान यांसारख्या देशांमध्ये ४७,६५३ युनिट्स निर्यात केले आहेत.
सप्टेंबर’२३ मध्ये भारतात प्रथम एलीव्हेट लाँच करण्यात आली आणि एचसीआयएलसाठी त्वरित प्रबळ व्यवसाय आधारस्तंभ बनली. या नवीन ऑफरिंगने आघाडीच्या मीडिया हाऊसेसकडून कार ऑफ द इअर, व्ह्यूवर्स चॉईस कार, एसयूव्ही ऑफ द इअर इत्यादी सारख्या पुरस्कारांसह २० हून अधिक प्रतिष्ठित ऑटोमोबाइल उद्योग पुरस्कार मिळवत स्पर्धात्मक देशांतर्गत एसयूव्ही बाजारपेठेत यशस्वीपणे स्वत:चे नाव प्रस्थापित केले. कारने आपला प्रबळ ग्राहकवर्ग स्थापित केला आहे आणि त्यांच्याकडून शिफारशीच्या उच्च दर्जाचा आनंद घेते.
एलीव्हेट जपानमध्ये निर्यात करण्यात आलेली कंपनीची पहिली मेड इन इंडिया मॉडेल आहे, ज्यामुळे तिच्या जागतिक पोहोचमध्ये वाढ झाली आणि भारतातील आपल्या उत्पादन कार्यसंचालनांमधून जागतिक दर्जाच्या कार्स उत्पादित करण्याप्रती एचसीआयएलची कटिबद्धता अधिक दृढ झाली. एलीव्हेट एचसीआयएलसाठी निर्यातीमध्ये सर्वाधिक योगदान देणारी मॉडेल आहे. २०२३ मध्ये होंडा एलीव्हेटच्या निर्यातींना सुरूवात झाल्यापासून या कारने कंपनीला निर्यात व्यवसाय आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ६५ टक्क्यांनी वाढण्यास आणि सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये (एप्रिल’२४ ते जानेवारी’२५ कालावधी) ९२ टक्क्यांहून अधिकपर्यंत वाढवण्यास मदत केली आहे.
या उपलब्धीबाबत मत व्यक्त करत होंडा कार्स इंडिया लि.चे मार्केटिंग अँड सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले, ”एलीव्हेटसाठी एकूण १ लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठणे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे, ज्यामुळे भारतातील देशांतर्गत एसयूव्ही बाजारपेठेतील होंडाची उपस्थिती आणि भारतामधून निर्यात व्यवसाय अधिक प्रबळ झाला आहे. जगभरात लाँच झाल्यापासून या मॉडेलला आकर्षक स्टायलिंग, आरामदायी इन-केबिन अनुभव, अपवादात्मक ‘फन टू ड्राइव्ह’ डायनॅमिक्स आणि प्रगत सुरक्षितता पॅकेजसाठी विविध वयोगटातील ग्राहकांकडून अपवादात्मक प्रशंसा व स्वीकृती मिळाली आहे. जपानला निर्यात करण्यात आलेल्या एलीव्हेटने आपली जागतिक पोहोच वाढवली, तसेच भारतातील आमच्या उत्पादन क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकतेला देखील अधिक दृढ केले. आम्ही बाजारपेठांतील ग्राहकांचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी ब्रँडवर विश्वास व प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि विश्वसनीय सहयोगी म्हणून एलीव्हेटची निवड केली आहे.”
‘अर्बन फ्रीस्टाइलर’च्या भव्य संकल्पनेवर विकसित एलीव्हेटचा सक्रिय जीवनशैली व जागतिक मानसिकता असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे. या वेईकलमध्ये व्हिज्युअली आकर्षक, अविश्वसनीयरित्या वैविध्यपूर्ण, आरामदायी व फन-टू-ड्राइव्ह एसयूव्हीची निर्मिती करण्याकरिता अत्याधुनिक आकर्षकता व कार्यक्षमता समाविष्ट आहे, ज्यामुळे ही एसयूव्ही शहरामधील व शहराबाहेरील साहसी राइडसाठी सुसज्ज आहे. ऑल न्यू एलीव्हेटमध्ये होंडाच्या सेफ्टीचे जागतिक मानक समाविष्ट आहे, ज्यामधून अनेक अॅक्टिव्ह व पॅसिव्ह प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये मिळतात, जसे नाविन्यपूर्ण अडवान्स्ड ड्रायव्हर असिसटण्स सिस्टम – होंडा सेन्सिंग. ग्राहकांना विविधता व निवड देण्यासाठी एचसीआयएलने एलीव्हेटचे अॅपेक्स एडिशन आणि ब्लॅक एडिशन लाँच केले, ज्यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एलीव्हेट ई२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल प्रमाणित आहे, ज्यामधून शाश्वत गतीशीलता आणि भारताच्या हरित व शुद्ध परिवहन संक्रमणाला पाठिंबा देण्याप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते.