
फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात नवनवीन बदल घडताना दिसत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा प्रवास अधिकच सोपा आणि सोयीस्कर होत आहे. काही वर्षांपूर्वी ट्युब्लेस टायर्स आले होते, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरक्षति झाला होता. मात्र आता मार्केटमध्ये एअरलेस टायर्सची जोरदार चर्चा आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतातील ऑटो बाजार झपाट्याने बदलत आहे आणि त्यासोबत टायर टेक्नॉलॉजीतही मोठे बदल दिसत आहेत. आतापर्यंत आपण ट्यूब असलेले टायर्स आणि ट्यूबलेस टायर्स वापरत आलो आहोत, परंतु आता एक नवी, अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञान आले आहे ते म्हणजे एअरलेस टायर्स. सध्याच्या काळात सुरक्षितता, उत्तम परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स ही लोकांची पहिली पसंती बनली आहे, आणि एअरलेस टायर्स हे सर्व निकष पूर्ण करतात. हे टायर्स बाईकपासून कारपर्यंतचे पूर्ण वजन सहज सांभाळत स्मूथ आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. चला या नवीन टायर्सबद्दल जाणून घेऊयात.
VinFast ची Electric MPV टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, जाणून घ्या फीचर्स
एअरलेस टायर्सची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात हवेची काहीही गरज नसते. त्यामुळे यात न हवा भरण्याचा त्रास, न पंक्चर होण्याचा धोका, आणि ना टायर ब्लास्ट होण्याची भीती. हवेऐवजी या टायर्समध्ये खास डिझाइन केलेले रबरचे स्पोक्स आणि बेल्ट वापरले जातात, ज्यामुळे टायरला आवश्यक ती मजबुती आणि आकार मिळतो. त्यामुळे हे टायर्स खराब होण्याची किंवा पंक्चर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
एअरलेस टायर्सची आतली रचना बाहेरून स्पष्टपणे दिसते, ज्यामुळे त्यांना एक वेगळा आणि फ्युचरिस्टिक लुक मिळतो. हे पूर्णतः मेंटेनन्स-फ्री असतात. यात ना एअर प्रेशर तपासण्याची गरज, ना वारंवार रिपेअरिंगची. त्यामुळे हे टायर्स लॉन्गड्राइव्ह आणि ऑफ-रोड परिस्थितींसाठी उत्तम पर्याय ठरतात.
सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
सर्वात स्वस्त एअरलेस टायर्सची किंमत साधारणतः 10,000 ते 20,000 रुपयांदरम्यान आहे. टायरचा आकार, गुणवत्ता आणि ब्रँडनुसार किंमत बदलते. दुसरीकडे, भारतात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्यूबलेस टायर्सची किंमत 1,500 पासून 60,000 पर्यंत जाते. म्हणजेच सध्याच्या घडीला एअरलेस टायर्स ट्यूबलेस टायर्सपेक्षा अनेक पट महाग आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान सर्वत्र लोकप्रिय झाल्यावर यांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
एअरलेस टायर्स अधिक मजबूत असतात आणि खडबडीत रस्त्यांवर धक्के शोषून घेतात, परंतु यामुळे राईड थोडी अधिक धक्कादायक देखील वाटू शकते. या टायर्सचा रस्त्याशी जास्त संपर्क येतो, ज्यामुळे वाहन पुढे नेण्यासाठी जास्त ड्रॅग होतो. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी जलद संपते आणि रेंज कमी होते