फोटो सौजन्य: @BunnyPunia(X.com)
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या सध्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेषसा लक्षकेंद्रित करत आहे. ग्राहक देखील इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. हीच मागणी लक्षात घेत, काही महिन्यांपूर्वी VinFast या व्हिएतनामी ऑटो कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारसह भारतात एंट्री घेतली.
VinFast कंपनी या वर्षाच्या सुरुवातीला, नवीन Limo Green 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्हीची डिझाइन पेटंट केल्यानंतर त्याची टेस्टिंग सुरू केली. आता ही कार भारतीय रस्त्यांवर देखील टेस्टिंग करताना दिसली आहे. VinFast Limo Green 7s ही 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि त्यात कोणते खास फीचर्स असतील याबद्दल अधिक जाणून घेऊया.
सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
अलीकडेच ही कार व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आली होती. आत ही कार भारतात टेस्ट होत आहेत. या टेस्टिंगमध्ये म्यूलमध्ये उंच, उभ्या स्थितीत, विशिष्ट उभ्या टेललाइट्स आणि एक मोठे ग्लासहाऊस आहे. अलॉय व्हील डिझाइन आणि टेलगेट प्रोफाइल देखील पेटंट फाइलिंगमध्ये दर्शविलेल्या मॉडेलसारखेच आहे.
VinFast Limo Green मध्ये 60.1 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 201 bhp पॉवर निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसोबत येते आणि 280 Nm टॉर्क देते. हा मॉडेल फ्रंट-व्हील-ड्राइव्ह सेटअपसह येतो आणि NEDC प्रमाणित रेंज सुमारे 450 किलोमीटर आहे. फास्ट चार्जिंगच्या मदतीने 10 ते 70% चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात.
व्हिएतनाममध्ये Limo Green चे केबिन स्वच्छ आणि मिनिमलिस्टिक डिझाइनमध्ये तयार केले आहे. यात 10.1-इंचांचे इन्फोटेनमेंट डिस्प्ले, लेदर-टाईप अपहोल्स्ट्री, 360-डिग्री कॅमेरा आणि फ्लोटिंग सेंटर कन्सोल यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. भारतातही हा मॉडेल अशाच प्रकारच्या फीचर्ससह तीन-रो सीटिंग आणि सात प्रवाशांची क्षमता घेऊन येण्याची शक्यता आहे.
Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार
जर ही कार भारतात लाँच झाली तर VinFast Limo Green या काही मोजक्या इलेक्ट्रिक 7-सीटर MPV पैकी एक ठरेल, जसे BYD eMAX 7 आणि Kia Carens Clavis EV. याचे मोठे आकारमान आणि प्रीमियम फीचर्स लक्षात घेतल्यास, हे वाहन फॅमिली बायर्ससाठी तसेच फ्लीट ऑपरेटर्ससाठीही एक आकर्षक पर्याय बनू शकते.
VinFast ने तमिळनाडूमध्ये आपला Toothukudi प्लांट सुरू केला आहे, जो व्हिएतनामबाहेरील कंपनीचा पहिला उत्पादन प्रकल्प ठरला आहे. हा प्लांट स्थानिक उत्पादनासोबतच निर्यातीसाठीही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि Limo Green हा त्यातून तयार होणाऱ्या पहिल्या मॉडेल्सपैकी एक असू शकतो.
व्हिएतनाममध्ये या वाहनाची किंमत सुमारे VND 749 मिलियन (अंदाजे ₹25 लाख) इतकी आहे, ज्यामध्ये 7 वर्षे/1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली जाते.






