
फोटो सौजन्य: Freepik
पूर्वी कार घेताना फक्त मायलेज आणि किंमतीला पहिले प्राधान्य दिले जायचे. परंतु आज कार घेताना अनेक फीचर्सचा तसेच विविध तंत्रज्ञानाचा विचार केला जातो. कारमध्ये अनेक तंत्रज्ञान असे असतात ज्याची ग्राहकांना खूप कमी माहिती असते. असेच एक तंत्रज्ञान म्हणजे ADAS.
ADAS चा फुल्ल फॉर्म हा एडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम असा आहे. हे तंत्रज्ञान आज प्रत्येक कारमध्ये असणे जरुरीचे आहे. हे एक प्रीमियम फिचर आहे, ज्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात. पण जेव्हा प्रश्न सुरक्षेचा येतो तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कार घेणार असाल तर त्यात ADAS हे तंत्रज्ञान आहे याची खात्री करून घ्या. चला या ADAS तंत्रज्ञान कारमध्ये असण्याचे 10 फायदे जाणून घेऊया.
कारमध्ये ADAS फीचर्समुळे अपघात टाळणे, लेनमध्ये राहणे इत्यादी महत्वपूर्ण माहिती मिळते. या फीचरमुळे आपली व आपल्या प्रियजनांची सुरक्षा वाढते. तसेच जर तुमच्या कारची टक्कर होणार असेल तर हे फीचर आपोआप ड्रायव्हरला सतर्क करते. इतकंच नाही तर काही परिस्थितींमध्ये हे फिचर स्वतःच ब्रेकही लावते.
जर तुम्ही तुमची लेन सोडून कार चालवत असाल तर ADAS फिचर ड्रॉयव्हरला सूचित करते. यामुळे द्रुतगती मार्गावर सुरक्षित ड्रायविंग होते.
ज्या कारमध्ये ADAS फीचर असते ते समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर राखून ऑटोमॅटिक वेग वाढवते. त्यामुळे लांबच्या प्रवासात तुमचा थकवा कमी होतो.
कारमध्ये ADAS फीचर्स असल्यामुळे ड्रायव्हरला कारच्या त्या भागांच्या स्तिथीबद्दल कळते जे तो थेट पाहू शकत नाही. यामुळे ड्रायव्हरला लेन बदलण्यात तसेच ओव्हरटेकिंगमध्ये मदत होते.
ADAS द्वारे कार पार्किंगसाठी एक सहाय्य सुविधा दिली गेली आहे. हे ड्रायव्हरला सुरक्षित आणि अचूक पार्किंग करण्यास मदत करते.
ADAS फिचर अचानक येणारी समस्या ओळखते आणि आपोआप ब्रेक मारते. यामुळे तुमच्यासोबत अपघात होण्याची शक्यता कमी होते.\
डास फिचर रस्त्यांवरील ट्रॅफिक सिग्नल आपोआप ओळखते आणि ड्रायव्हरला त्यांच्याबद्दल माहिती देते. यामुळे तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करत नाही. तसेच तुमची ड्रायविंग अधिक सेफ होते.