
वडिलांची कला, मुलाची मेहनत आणि TVS XL100ची साथ; अशी आहे कोल्हापूरच्या कुंभार कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी
भारतातील टॉप 10 ऑटोमोबाईल फेस्टिव्हल्स! गाड्या आणि बाईकप्रेमींसाठी असते ही खास पर्वणी! जाणून घ्या
लहानपणापासून नवनाथ याने हाताने बनवलेल्या चाळण्या घेऊन पहाटेच घराबाहेर पडताना आपल्या वडिलांना पाहिले होते. पहिल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक तास पायी प्रवास करावा लागत होता. प्रवासासाठी लागणाऱ्या या जास्तीच्या वेळामुळे कमी गावांपर्यंत पोहोचणे शक्य होत असे, ज्यामुळे मागणी असूनही व्यवसायाचा विस्तार करण्यावर मर्यादा येत होत्या.
सुमारे 5 वर्षांपूर्वी एका मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार, नवनाथ आणि त्याच्या वडिलांनी TVS XL100 ही गाडी खरेदी केली. त्यांनी सुरुवातीला केवळ एक व्यावहारिक गुंतवणूक म्हणून घेतलेली ही गाडी अत्यंत कमी वेळात त्यांच्या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायासाठी नवी दिशा देणारी ठरली. आज, 25 वर्षांचा नवनाथ आपल्या वडिलांनी हाताने बनवलेल्या चाळण्या घेऊन दररोज जवळपास १०० किलोमीटरचा प्रवास करतो. यामध्ये तो अदमापूर, मुडल टिटा, निपाणी आणि कर्नाटक सीमेवरील विविध गावांपर्यंत जातो. जवळच्याच औद्योगिक वसाहतीमधील आपली कामाची वेळ संपवल्यानंतर, तो टीव्हीएस XL100 वर विविध शहरे, गावांमधील ग्राहकांना भेटण्यासाठी निघतो.
आज मी ज्या -ज्या ठिकाणी प्रवास करत आहे, तिथे पूर्वी पोहोचणे कठीण होते. मात्र TVS XL100 मुळे मला नवीन बाजारपेठा शोधण्याचा आणि आमचा व्यवसाय वाढवण्याचा आत्मविश्वास मिळाला, असे नवनाथ याने सांगितलं आहे. नवनाथ याच्या मते, TVS XL100 या गाडीचे मायलेज, कमी देखभाल खर्च आणि गावातील डोंगराळ, चिखलाने भरलेले रस्ते, पायवाटांवरील भरवशाची कामगिरी यामुळे ही गाडी त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. याचा सकारात्मक परिणाम केवळ व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही.
वाढत्या मागणीमुळे कुटुंबाने आपल्या जुन्या घराचे रूपांतर एका वर्कशॉपमध्ये केले आहे, तर त्याच परिसरात आता नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. “यामुळे आम्हाला अधिक उत्पन्न मिळवण्यास, आमचा व्यवसाय वाढवण्यास आणि आमचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. माझ्यासाठी, TVS XL100 ही साक्षात लक्ष्मीदेवीसारखी आहे,” असे नवनाथ याने सांगितलं आहे. कुंभार कुटुंबीयांसारख्या लोकांसाठी, वाहन असणे म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नव्हे, तर नवीन संधींकडे जाणारा एक दुवा आहे. अनेक दशकांपासून चालत आलेली कला जोपासत असतानाच अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करून, TVS XL100 त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या प्रवासातील एक विश्वासू साथीदार बनली आहे.