
फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com
सर्वात आधी, 2026 सेल्टोसचे डायमेन्शन जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठे आहेत. नवीन-जनरेशन सेल्टोस 95 मिमी लांब आहे आणि तिचा व्हीलबेस 80 मिमीने मोठा आहे. ती 30 मिमीने अधिक रुंद देखील आहे आणि त्यात 14 लिटर अतिरिक्त बूट स्पेस मिळते. अपडेटेड डिझाइन घटकांसोबतच, या मोठ्या डायमेन्शन्समुळे नवीन-जनरेशन सेल्टोस अधिक दमदार ठरणार आहे. तसेच जुन्या मॉडेलच्या तुलनेत केबिनमधील स्पेसही अधिक आहे.
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल Maruti Suzuki Ignis चा EMI? जाणून घ्या सोपा हिशोब
२०२६ सेल्टोसच्या डिझाइनमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे फ्लश-टाइप डोअर हँडल्स. जुन्या सेल्टोसमध्ये दिसणाऱ्या ट्रेडिशनल डोअर हँडल्सच्या तुलनेत, नवीन मॉडेलमध्ये फ्लश-टाइप डोअर हँडल्स देण्यात आले आहेत. याहूनही चांगली गोष्ट म्हणजे ते मोटारयुक्त आहेत.
नवीन जनरेशन किआ सेल्टोसच्या पूर्णपणे नव्या इंटीरियरमधील सर्वात मोठा हायलाइट म्हणजे त्याची अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले. जुन्या सेल्टोसमध्ये असलेल्या 10.25-इंच स्क्रीनच्या तुलनेत आता यात 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यासोबतच क्लायमेट कंट्रोलसाठी स्वतंत्र 5-इंच टचस्क्रीन पॅनलही उपलब्ध आहे, ज्यामुळे केबिन अधिक आधुनिक आणि प्रीमियम वाटतो.
2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत
जुन्या सेल्टोसमध्ये केवळ सिंगल-पेन सनरूफ देण्यात आला होता. मात्र, नवीन जनरेशन सेल्टोसमध्ये आता मोठा पॅनोरॅमिक सनरूफ मिळतो, जो केबिनच्या मोठ्या भागावर पसरलेला आहे. त्यामुळे केबिनमध्ये अधिक नैसर्गिक प्रकाश येतो आणि इंटीरियर अधिक प्रशस्त व हवेशीर वाटतो.
नवीन सेल्टोसच्या सेफ्टी किटमध्ये किआने साइड पार्किंग सेन्सर्सचा समावेश केला आहे. फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्ससोबत हे साइड सेन्सर्स वाहनाच्या बाजूला असलेले अडथळे ओळखण्यास मदत करतात, ज्यामुळे अरुंद जागेत वाहन वळवणे आणि पार्किंग करणे अधिक सोपे होते.
2026 किआ सेल्टोस आता चार नव्या एक्स्टेरियर कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कलर ऑप्शन्सची संख्या बारा झाली आहे. या नव्या रंगांमध्ये Morning Haze, Magma Red, Frost Blue आणि Ivory Silver Gloss यांचा समावेश आहे.