फोटो सौजन्य: Gemini
Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?
Tata Motors सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर सर्वाधिक भर देत आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनी Tata Sierra EV आणि पूर्णपणे नवीन Punch EV लाँच करण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस Avinya रेंजची सुरुवात होईल, जी Tata ची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असेल.
Sierra EV दोन बॅटरी पर्यायांसह सादर केली जाऊ शकते, ज्याची रेंज 500 किलोमीटरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. Punch EV मध्ये डिझाइन आणि इंटीरियर दोन्हीमध्ये बदल पाहायला मिळतील. तर Avinya ही JLR च्या EMA आर्किटेक्चरवर आधारित असून Tata ची सर्वात प्रीमियम EV मानली जाणार आहे.
Renault ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की नवीन जनरेशन Duster येत्या 26 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच केली जाईल. ही SUV CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार असून सुरुवातीला पेट्रोल इंजिन पर्यायात उपलब्ध होईल. डिझाइन आणि इंटिरिअर आधीपेक्षा अधिक आधुनिक असणार आहे.
CID फेम Daya ने ‘ही’ प्रीमियम फीचर्स असणारी आलिशान कार, किंमत थेट कोटींच्या घरात
Renault Duster वर आधारित Nissan Tecton ही SUV देखील 2026 च्या सुरुवातीला भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन्ही SUVs मिड-साइज सेगमेंटमध्ये Creta आणि Seltos ला थेट टक्कर देतील.
Maruti Suzuki पहिल्यांदाच पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV e Vitara सह EV सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. ही SUV नवीन Heartect-e प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यामध्ये 49 kWh आणि 61 kWh बॅटरीचे पर्याय मिळणार आहेत. मोठ्या बॅटरीसह या SUV ची रेंज 543 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. विशेष म्हणजे या SUV ला भारत NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे.
Mahindra आपली लोकप्रिय XUV700 ची अपडेटेड व्हर्जन XUV 7XO या नावाने सादर करणार आहे. या SUV मध्ये नवीन डिझाइनसह ट्रिपल स्क्रीन असलेले प्रीमियम केबिन मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय Vision S या कॉन्सेप्टचे प्रोडक्शन व्हर्जन देखील 2026 च्या अखेरीस बाजारात येऊ शकते. ही SUV आकाराने Scorpio-N पेक्षा लहान असली तरी दमदार परफॉर्मन्स देणारी असेल.
Hyundai 2026 मध्ये भारतात लोकली तयार करण्यात आलेली आपली पहिली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहे, जी ग्लोबल Inster मॉडेलवर आधारित असू शकते. दुसरीकडे, नवीन जनरेशन Kia Seltos च्या किमतींची घोषणा 2 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. याशिवाय Kia पुढील वर्षी Sorento Hybrid सुद्धा भारतीय बाजारात सादर करू शकते.
एकूणच, 2026 मध्ये भारतीय SUV बाजारात पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या SUVs चे दमदार पर्याय उपलब्ध होणार असून ग्राहकांसाठी निवडीचे पर्याय अधिक विस्तृत होणार आहेत.






