फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये पूर्वी कार खरेदी करताना खरेदीदार फक्त त्याच्या किंमत आणि मायलेजवर लक्षकेंद्रित करत होते. मात्र, आजचा ग्राहक कार खरेदी करताना कारमधील सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा बारकाईने पाहत असतो. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार सेफ्टी असणाऱ्या कार ऑफर करत असतात. नुकतेच Maruti Suzuki च्या Invicto कारची सुद्धा क्रॅश टेस्ट झाली.
देशातील प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Maruti Suzuki कंपनीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहने विकली जातात. कंपनीकडून ऑफर करण्यात येणारी प्रीमियम MPV म्हणजे Maruti Invicto चा अलीकडेच BNCAP (भारत एनसीएपी) कडून क्रॅश टेस्ट करण्यात आला आहे. या क्रॅश टेस्टनंतर या MPV ला सुरक्षेच्या दृष्टीने किती गुण मिळाले याची माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
भारत NCAP कडून भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या Maruti Invicto या MPV चे क्रॅश टेस्ट करण्यात आली. या क्रॅश टेस्टनंतर कारला सुरक्षेसाठी पाच पैकी पूर्ण पाच स्टार रेटिंग मिळाले आहे.
भारत एनसीएपीने जाहीर केलेल्या निकालानुसार, या कारला प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी दोन्ही श्रेणींमध्ये पाच-पैकी पाच स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढ सुरक्षेसाठी 32 पैकी 30.47 गुण,
आणि बालकांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत.
BNCAP ने दिलेल्या माहितीनुसार, SUV ने प्रौढांसाठी फ्रंटल ऑफसेट बॅरियर टेस्टमध्ये 14.47 गुण आणि साइड मूव्हेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 गुण मिळवले.
प्रौढ आणि मुलांच्या क्रॅश टेस्टमध्ये तिने 45 गुण मिळवले, ज्यामध्ये डायनॅमिक स्कोअर 24, CRS इंस्टॉलेशन स्कोअर 12 आणि व्हील असेसमेंट स्कोअर नऊ यांचा समावेश आहे.
क्रॅश टेस्टनंतर भारत NCAP ने जाहीर केलेल्या निकालांमध्ये असे म्हटले आहे की SUV ची टेस्टिंग भारतीय बनावटीच्या युनिटवर करण्यात आली आहे आणि हे निकाल भारतात ऑफर केलेल्या 8S, VX8S SHEV आणि ZX7S SHEV व्हेरिएंट्ससाठी वैध असतील. क्रॅश टेस्टमध्ये पूर्ण पाच गुण मिळवणारी ही मारुतीची तिसरी कार आहे. याआधी, Maruti Dzire आणि Maruti Victoris यांनाही क्रॅश टेस्टमध्ये पूर्ण पाच स्टार रेटिंग मिळाले आहेत.