
फोटो सौजन्य:iStock
भारताच्या ऑटो बाजारात नोव्हेंबर 2025 मध्ये दमदार कार्स लाँच होण्यास सज्ज होतं आहे. Hyundai, Tata Motors आणि Mahindra या तीन प्रमुख कंपन्या आपापल्या नवीन SUV मॉडेल्ससह भारतीय बाजारात नवीन एसयूव्ही आणणार आहेत. या तिन्ही कार्स डिझाइन, तंत्रज्ञान, सेफ्टी आणि लक्झरीच्या बाबतीत ग्राहकांना भावणार हे नक्की. चला पाहूया, कोणत्या 3 SUV येत्या महिन्यात लाँच होणार आहेत?
Hyundai Venue चे सेकंड-जनरेशन मॉडेल 4 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. ही नवीन Venue पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी आणि मस्क्युलर डिझाइनमध्ये येईल. यात C-शेप्ड LED DRLs, स्प्लिट हेडलॅम्प्स आणि फुल-विड्थ LED रिअर लाइटबार देण्यात आले आहेत. साइड प्रोफाइलमध्ये 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि उभे व्हील आर्चेस यामुळे तिला प्रीमियम लूक मिळतो.
इंटिरिअरमध्ये ड्युअल 12.3-इंच कर्व्ड डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि एम्बिएंट लाइटिंग यांसारखे फीचर्स असतील. ब्लॅक-बेज ड्युअल-टोन केबिन आधुनिक आणि अपमार्केट फील देते. प्रवाशांच्या सुरक्षतितेच्या दृष्टीने Venue मध्ये लेव्हल 2 ADAS सिस्टीम मिळेल, ज्यात Forward Collision Avoidance Assist, Smart Cruise Control आणि Lane Keeping Assist असे 16 सेफ्टी फीचर्स असतील.
Tata Sierra 2025 ही भारतीय बाजारातील सर्वात जास्त अपेक्षित SUV पैकी एक आहे. टाटा मोटर्स ही क्लासिक SUV 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच करणार आहे. 90 च्या दशकातील आयकॉनिक Sierra आता रेट्रो-मॉडर्न डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्ससह परत येत आहे. याच्या डिझाइनमध्ये क्लासिक रिअर विंडोज, बॉक्सी व्हील आर्चेस आणि उंच बोनट कायम ठेवले आहेत, तर स्लिम LED हेडलाइट्स, शार्प रूफलाइन आणि शॉर्ट ओव्हरहॅंग्सने तिला आधुनिक रूप दिले आहे.
या कारचे इंटिरिअर पूर्णपणे प्रीमियम असेल. यात तीन 12.3-इंच स्क्रीन असतील, एक ड्रायव्हर डिस्प्ले, एक इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि एक पॅसेंजर डिस्प्ले साठी. याशिवाय व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरामिक ग्लास रूफ, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल आणि एम्बिएंट लाइटिंगसारखी फीचर्स असतील.
फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये मल्टीपल एअरबॅग्स, 360° कॅमेरा, ESC, ABS आणि लेव्हल 2 ADAS सिस्टीम दिले जाईल. इंजिन पर्यायांमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल (170 bhp), 1.5L नेचरल पेट्रोल आणि 1.5L किंवा 2.0L टर्बो डिझेलचे पर्याय असतील. किंमत 15 लाख ते 25 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान अपेक्षित आहे.
Mahindra आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV XEV 7e ला नोव्हेंबर 2025 च्या शेवटी लाँच करणार आहे. ही SUV कंपनीच्या Born Electric Series चा भाग असून, आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक ईव्ही मानली जाते.
XEV 7e चे डिझाइन Mahindra XUV700 वर आधारित आहे, मात्र यात ब्लँक्ड ग्रिल, कनेक्टेड LED लाइटबार, फ्लश डोअर हँडल्स आणि एरो-ऑप्टिमाइझ्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही कार फ्युचरिस्टिक SUV भासते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, ESC, 360° कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS फीचर्स दिले जातील. पॉवरट्रेनमध्ये दोन बॅटरी पर्याय असतील आणि अंदाजे किंमत 20 लाख ते 35 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असेल.