 
        
        'ही' कंपनी भारतात एकामागोमाग 10 नवीन कार लाँच करणार
भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यापाराची सुवर्णसंधी! याच संधीचे सोनं करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात दमदार कार ऑफर करत असतात. तसेच दर दिवशी मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येत कारची विक्री होत असल्याने कंपन्या नेहमीच ग्राहकांना उत्तम फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची कंपनी म्हणजे Honda.
भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेत आपला गमावलेले वर्चस्व परत मिळवण्यासाठी होंडा मोटर कंपनीने मोठ्या योजना आखल्या आहेत. जपानी वाहन निर्माता कंपनी होंडा मोटरने 2030 पर्यंत भारतीय बाजारात किमान 10 नवीन कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 7 नवीन एसयूव्ही असतील. ही वाहने भारतीय बाजारपेठेत Toyota, Suzuki, आणि Hyundai सारख्या ऑटोमेकर्सशी थेट स्पर्धा करतील.
Toyota च्या ‘या’ ॲडव्हान्स कारमध्ये आली खराबी, 2,257 युनिट्ससाठी रिकॉल जाहीर
भारतामध्ये Honda ची सध्याची बाजारपेठ काहीशी कमी झालेली आहे. सध्या कंपनीकडे केवळ 3 प्रमुख मॉडेल्स उपलब्ध आहेत. ते म्हणजे Elevate मिड-साइज SUV, आणि City तसेच Amaze या सेडान. मर्यादित मॉडेल्समुळे Honda ची बाजारातील शेअर देखील घटली आहे, विशेषतः भारतात सेडान कार्सची मागणी कमी झाल्यापासून. Elevate SUV देखील Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत विशेष कामगिरी करू शकलेली नाही. त्यामुळे Honda साठी नवीन कार लाँच करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, जेणेकरून ते भारतीय बाजारपेठेत आपली स्थिती पुन्हा मजबूत करू शकेल.
Honda चे अध्यक्ष आणि CEO तोशिहिरो मिबे यांनी Japan Mobility Show दरम्यान सांगितले की कंपनी भारतीय बाजारासाठी आक्रमक मॉडेल लाँच प्लनिंगवर काम करत आहे. Honda ची योजना 2030 पर्यंत 10 किंवा त्याहून अधिक नवीन मॉडेल्स लाँच करण्याची आहे. त्यापैकी SUV सेगमेंटमध्ये, जो आता भारतात मुख्य प्रवाहातील बाजार झाला आहे, कंपनीचे लक्ष्य 7 नवीन SUVs लाँच करण्याचे आहे.
फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची ‘ही’ लोकप्रिय कार
कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की भारत आता त्यांच्या दृष्टीने एक प्रमुख ऑटो बाजार बनला आहे. यासाठी विशेष प्रकल्प टीम स्थापन करण्यात आली असून, ती या धोरणानुसार काम करणार आहे. या 7 SUV पैकी काही ग्लोबल मॉडेल्स असतील, तर काही विशेषतः भारतीय बाजाराच्या गरजा आणि पसंती लक्षात घेऊन तयार केल्या जातील.






