 
        
        फक्त 6522 रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Motors ची 'ही' लोकप्रिय कार
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर असतात. काही कंपनीच्या कार्सवर तर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवतात. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे Tata Motors.
टाटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे टाटा टियागो. टाटा मोटर्स देशात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी टाटा टियागो ही हॅचबॅक कार म्हणून ऑफर करते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 6522 रुपयांच्या EMI साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
10 वर्षांपासून मार्केट आमचंच! Maruti च्या ‘या’ Car ने एक दशकापासून ग्राहकांना ठेवलंय बांधून
टाटा मोटर्स टियागोचा बेस व्हेरिएंट 4.57 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केली जाते. दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत अंदाजे 5.05 लाख रुपये आहे. यामध्ये आरटीओसाठी अंदाजे 18000 आणि इंश्युरन्ससाठी अंदाजे 29000 रुपये समाविष्ट आहेत, त्याव्यतिरिक्त 4.57 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीचा समावेश आहे.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 4.05 लाख रुपये बँकेकडून फायनास घ्यावे लागतील. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.05 लाख रुपयांचे कर्ज देते, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दरमहा 6522 रुपयांचा EMI भरावा लागेल.
नवीन Kawasaki Versys X 300 झाली लाँच, मिळाले एकापेक्षा एक भन्नाट अपडेट्स
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 4.05 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला दरमहा 6522 रुपये EMI भरावी लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही 1.42 लाख रुपयांचा व्याज भराल. त्यामुळे कारची एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड चार्जेस आणि व्याज धरून एकूण किंमत सुमारे 6.47 लाख रुपये एवढी येईल.
टाटा मोटर्सकडून सादर करण्यात आलेली टियागो (Tiago) ही हॅचबॅक कार सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. भारतीय बाजारात तिचा थेट स्पर्धा Maruti Alto K10, Celerio, S-Presso, Wagon R आणि Hyundai Grand i10 Nios यांसारख्या हॅचबॅक कार्ससोबत होतो. याशिवाय, किंमतीच्या दृष्टीने काही प्रीमियम हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट SUV मॉडेल्सकडूनही तिला चांगली स्पर्धा मिळते.






