Legender Electric Scooter चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँडपैकी एक असलेल्या झेलीओ ई-मोबिलिटीने त्यांच्या लोकप्रिय लेजेंडर इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच केले आहे. अधिक स्टायलिश लूक आणि स्मार्ट फिचर्ससह हे मॉडेल शहरी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. चला या नवीन स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फेसलिफ्ट लेजेंडरमध्ये आता तीन नवीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:
या स्कूटरमध्ये 25 किमी/तास इतका टॉप स्पीड असून, एका चार्जमध्ये 150 किमी पर्यंतची रेंज मिळते. फक्त 1.5 युनिट वीजेवर चालणारी ही स्कूटर शक्तिशाली BLDC मोटरद्वारे सुसज्ज आहे. तिचे एकूण वजन 98 किलो असून, ती 150 किलो लोड सहज वाहून नेऊ शकते. 170 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि विविध रस्त्यांवर सहज चालणारी रचना यामुळे ही स्कूटर शहरासाठी एक आदर्श पर्याय ठरते.
लिथियम-आयन बॅटरी: ४ तास
जेल बॅटरी: ८ तास
ही स्कूटर आता तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – रस्टी ऑरेंज, ग्लॉसी ग्रीन आणि ग्लॉसी ग्रे.
झेलीओ ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणतात, “लेजेंडर नेहमीच स्टाइल आणि विश्वसनीयतेचे प्रतीक राहिले आहे. आता हे फेसलिफ्ट मॉडेल अधिक स्मार्ट, आरामदायी आणि युवकांना आकर्षित करणारे ठरेल.”
झेलीओ सर्व स्कूटर मॉडेल्सवर 2 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 1 वर्षाची वॉरंटी देतात. लाँचच्या निमित्ताने कंपनीने पहिल्या 1000 ग्राहकांसाठी मोफत सेफ्टी हेल्मेट देण्याची ऑफरही जाहीर केली आहे.
सर्वसाधारणपणे, फेसलिफ्ट लेजेंडर ही स्मार्ट फीचर्ससह सुसज्ज, स्टायलिश आणि पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी शहरी ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह व किफायतशीर पर्याय ठरते.