फोटो सौजन्य: @KetanPa14035905/ x.com
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळत आहे. ग्राहक देखील वाढत्या इंधनांच्या किमतीला कंटाळून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना पहिले प्राधान्य देत आहे. ग्राहकांचा हाच उत्तम प्रतिसाद पाहता अनेक ऑटो कंपन्या आता EVs च्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे. आता लवकरच टोयोटा सुद्धा त्याची इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे.
टोयोटाने आपली नवी इलेक्ट्रिक SUV अर्बन क्रूझर BEV (Toyota Urban Cruiser) भारतातही शोकेस केली आहे. कंपनी आता देशातील आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. हा मॉडेल यावर्षी झालेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे ही SUV मारुती सुझुकी ई-व्हिटारासोबत प्लॅटफॉर्म शेअर करणार असून, ती गुजरातमधील प्लांटमध्ये तयार होईल. कंपनीचे नियोजन आहे की ही कार 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत बाजारात आणली जाईल. मात्र, अशीही शक्यता आहे की तिची एंट्री यावर्षीच्या शेवटी किंवा २०२६ च्या सुरुवातीस होऊ शकते.
फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप
टोयोटा अर्बन क्रूझर BEV ला दोन बॅटरी पॅक मिळतील, पहिला 49 kWh चा पॅक आहे जो 144 हॉर्सपॉवर देईल आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सेटअपमध्ये येईल. त्याच वेळी, 61 kWh चा एक मोठा पॅक देखील उपलब्ध असेल ज्यामध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह दोन्हीचा पर्याय असेल. ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेर्जनची पॉवर 184 हॉर्सपॉवर पर्यंत असेल. कंपनीचा दावा आहे की ही SUV एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. यासोबतच, त्यात DC फास्ट चार्जिंग देखील सपोर्ट आहे जेणेकरून बॅटरी लवकर चार्ज करता येईल.
GST कमी झाल्यास देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत किती होईल? छप्परफाड होणार बचत
इंटिरिअरकडे पाहिल्यास यात मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlayसह सुसज्ज असेल. याशिवाय, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्स स्टँडर्ड, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्राईव्ह मोड्स आणि फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील यांसारख्या अनेक आधुनिक सुविधा मिळतील.
सर्वात खास बाब म्हणजे, यात इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला असल्याने बॅटरी बसवूनही केबिनमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध होईल आणि प्रवाशांना अरुंद वाटणार नाही.