फोटो सौजन्य: @Mahindra_Auto (X.com)
महिंद्राने देशात दमदार एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच बदलत्या काळानुसार आपल्या वाहनांमध्ये बदल करत असतात. सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाहनांना भारतीय मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत कंपनीने दोन दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या होत्या. आता 15 ऑगस्ट रोजी कंपनीने एक नव्हे तर 4 एसयूव्ही कॉन्सेप्ट कार सादर केल्या आहेत.
महिंद्राने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चार नवीन एसयूव्ही कॉन्सेप्ट – Vision X, Vision T, Vision S आणि Vision SXT- सादर केल्या आहेत. कंपनीने Freedom NU नावाच्या त्यांच्या कार्यक्रमात हे मॉडेल सादर केले आहेत. या चार कॉन्सेप्ट वेगवेगळ्या डिझाइन आणि सेगमेंट दर्शवितात. परंतु त्या एकाच प्लॅटफॉर्मवर विकसित केल्या जातील. ज्याला महिंद्राने NU.IQ प्लॅटफॉर्म असे नाव दिले आहे. येत्या काळात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी येणाऱ्या सी-सेगमेंट वाहनांमध्ये हे नवीन प्लॅटफॉर्म वापरले जाईल.
महिंद्रा यांनी या दोन्ही कॉन्सेप्ट सादर करण्यापूर्वी याचे अनेक टीझर रिलीज केले होते. डिझाइनच्या बाबतीत दोन्ही पूर्वी दाखवलेल्या Thar.e संकल्पनेपासून प्रेरित असल्याचे दिसते. व्हिजन टी क्लासिक बॉक्सी आकारात सादर करण्यात आली आहे. Vision SXT मध्ये पिकअप ट्रॅकसारखे केबिन स्टाइलिंग आहे, ज्यामध्ये स्पेअर व्हील डेकवर ठेवले आहे.
या नवीन कॉन्सेप्टची रचना चौकोनी आकारावर आधारित आहे, परंतु त्याचे फ्रंट प्रोफाइल चांगलेच आधुनिक आणि स्टायलिश बनवण्यात आले आहे. ट्विन पीक्स लोगोच्या दोन्ही बाजूंना उभ्या सेट केलेले एलईडी लाइट्स आणि एल-आकाराचे हेडलॅम्प त्याला एक अतिशय वेगळी ओळख देतात. ऑफ-रोडिंग वाढविण्यासाठी, त्यात रूफ-माउंटेड लाइट्स, सॉलिड बंपर, साइड प्लास्टिक क्लॅडिंग आणि मोठे व्हील आर्च देण्यात आले आहेत. यासोबतच, फ्लश डोअर हँडल, स्लीक ओआरव्हीएम आणि नवीन अलॉय व्हील डिझाइन या कारला एक अतिशय प्रीमियम टच देतात. येत्या काळात, बोलेरोमध्येही त्याच्या काही डिझाइन दिसू शकतात.
ही कॉन्सेप्ट याच्या आकर्षक डिझाइनसाठी खूप खास आहे. या कारमध्ये स्लिम हेडलॅम्प, स्लीक एअर इनटेक आणि लांब हुड देखील आहे. जे या कारला स्पोर्टी लूक देते. कारच्या छताचा पहिला भाग स्लोपिंग डिझाइनमध्ये आहे, जो तिला कूपसारखा लूक देतो. फ्लश टाइप डोअर हँडल आणि ड्युअल टोन रिअर बंपर या कारला अजून प्रीमियम कार बनवतात.