फोटो सौजन्य: Pinterest
जर तुम्हाला महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा ‘बेस व्हेरिएंट’ खरेदी करायचा असेल आणि 2 लाखांचे ‘डाऊन पेमेंट’ करून ही एसयूव्ही घरी आणायचे असेल, तर तुमचा मासिक EMI किती असेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Vinfast ची नवीन MPV भारतात झाली लाँच, जाणून घ्या रेंज, किंमत आणि फीचर्स
या SUV च्या बेस व्हेरिएंटची किंमत सध्या 13 लाख (एक्स-शोरूम किंमत) रुपये इतकी आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर 13 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, नोंदणी (Registration) आणि विम्याचे (Insurance) शुल्क देखील एकूण खर्चात समाविष्ट होईल. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकाला नोंदणी करापोटी (Registration Tax) अंदाजे 1.62 लाख आणि विम्यासाठी सुमारे 79 हजार रुपये भरावे लागतील. याव्यतिरिक्त, TCS (Tax Collected at Source) शुल्क म्हणून अंदाजे 13000 रुपये देखील लागू होतील. परिणामी, या एसयूव्हीची ‘ऑन-रोड’ किंमत 15.54 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही स्कॉर्पिओ क्लासिकचा बेस व्हेरिएंट घेतला, तर बँक सामान्यतः एक्स-शोरूम किमतीवर कर्ज उपलब्ध करून देते. अशा परिस्थितीत तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 13.54 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी मिळाले, तर दर महिन्याला सुमारे 21,793 रुपये EMI भरावी लागेल. ही EMI तुम्हाला सलग सात वर्षे भरावी लागणार आहे.
9% व्याजदराने 13.54 लाख रुपयांचे कर्ज 7 वर्षांसाठी घेतल्यास, एकूण व्याज रक्कम सुमारे 4.76 लाख रुपये इतकी होते. म्हणजेच, EMIच्या माध्यमातून तुम्ही मूळ रक्कम आणि व्याज मिळून अधिक पैसे भरता. यामुळे कारची एकूण किंमत (एक्स-शोरूम, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून) सुमारे 20.30 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे EMI सोपी वाटली तरी दीर्घकालीन खर्च लक्षात घेणे आवश्यक आहे.
Mahindra ची स्कॉर्पिओ क्लासिक मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये येते. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा Mahindra Scorpio N, Mahindra XUV700, MG Hector, Tata Safari, Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Creta यांसारख्या लोकप्रिय SUV सोबत होते.






