India U19 Asia cup qualification Equation
उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला युएईविरुद्धचा आपला पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यातील विजयामुळे भारताची थेट उपांत्य फेरीसाठी पात्रता निश्चित होईल. याउलट, युएईविरुद्ध पराभव झाल्यास स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येईल. हा सामना भारतीय संघासाठी एक प्रकारे बाद फेरीचा आणि ‘करा किंवा मरा’ असा सामना ठरेल.
पाकिस्तान संघाकडून पराभूत होऊनही, भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दोन सामन्यांनंतर भारत आणि युएई संघाकडे प्रत्येकी दोन गुण आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीसाठी आधीच पात्रता मिळवली आहे. भारत आपला पुढील सामना युएई संघाविरुद्ध खेळेल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. पण आता या स्टार फलंदाजांना युएईविरुद्ध दमदार कमबॅर करावे लागेल. संघाला सलामीवीर आर्यवीर सेहवागकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल. कर्णधार लक्ष्य रायचंदानीला आघाडीवरून नेतृत्व करून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. विकेटकीपर अन्वय द्रविडची मधल्या फळीतील आणि शेवटच्या षटकांमधील स्फोटक फलंदाजी संघासाठी निर्णायक ठरेल. याशिवाय, पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या अर्जुन राजपूतवरही चाहते आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल.
संयुक्त अरब अमिराती अंडर-१९ क्रिकेट संघ: अयान मिसबाह (कर्णधार), मोहम्मद नफीस (यष्टीरक्षक), यायिन राय, उदीश सुरी, नूरउल्ला अयुबी, झैनुल्लाह रहमानी, अहमद खुदादाद, नसीम खान, रैजल नादिर, उमर तौकीर, मुहम्मद उमर फैसल खान, हदायतुल्लाह खान
भारताचा अंडर – १९ क्रिकेट संघ: लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवीर गौड, अर्जुन राजपूत, इशान सूद, यशवर्धन चौहान, कुशाग्र ओझा, शविन विनोद, काव्या पटेल, मोहित उल्वा, मनाल चौहान, आर्यन






