
महिंद्राच्या एकूण सेल्सचा विचार केला तर देशातील विक्री आणि एक्सपोर्ट मिळून कंपनीने सप्टेंबरमध्ये 1,14,874 वाहनांची विक्री केली. कंपनीच्या एकूण सेल्समध्येही 15% वाढ झाली आहे. नवीन आणि अपडेटेड SUV मॉडेल्सच्या सातत्याने होणाऱ्या एन्ट्रीमुळे युटिलिटी व्हेईकल सेगमेंटला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीतून दिसते.
पहिल्या 6 महिन्यांत SUV विक्रीत 20% वाढ
एप्रिल ते सप्टेंबर 2026 या FY2027 च्या पहिल्या 6 महिन्यांत महिंद्राने 3,58,142 युटिलिटी व्हेईकल्स विकल्या. मागच्या आर्थिक वर्षातील 2,97,570 युनिट्सच्या तुलनेत ही 20% वाढ आहे. म्हणजेच कंपनीने या कालावधीत मागच्या वर्षापेक्षा 60,572 जास्त SUV विकल्या आहेत.
दरम्यान, कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्येही वाढ दिसून आली. 2 टनपेक्षा कमी वजनाच्या LCV ची सप्टेंबरमध्ये 4,044 युनिट्स विक्री झाली, जी 19% जास्त आहे. 2 टन ते 3.5 टन श्रेणीतील विक्री 26,376 युनिट्सवर पोहोचली असून त्यात 13% वाढ झाली.
थ्री-व्हीलर आणि एक्सपोर्टचेही आकडे समोर
महिंद्राच्या थ्री-व्हीलर सेल्सनेही सप्टेंबरमध्ये चांगली कामगिरी केली. इलेक्ट्रिक मॉडेल्ससह या सेगमेंटमध्ये 16,343 युनिट्स विकल्या गेल्या. मागच्या वर्षीच्या 13,017 युनिट्सच्या तुलनेत ही 26% वाढ आहे.
पण एक्सपोर्टमध्ये सप्टेंबरमध्ये 7% घट झाली. कंपनीने 4,019 वाहनांची निर्यात केली, तर मागच्या वर्षी हा आकडा 4,320 होता. तरीही एप्रिल-सप्टेंबर कालावधीतील एक्सपोर्ट 30,031 युनिट्सवर पोहोचला असून, त्यात 48% वाढ झाली आहे.
नवीन SUV आणि EV मॉडेल्सवर नजर
महिंद्राच्या SUV लाइनअपमध्ये पुढील काळात आणखी मॉडेल्सची भर पडणार आहे. Vision S कॉन्सेप्टवर आधारित कॉम्पॅक्ट SUV, प्रीमियम BE7 आणि Scorpio N वर आधारित Lifestyler पिकअप यांसारख्या मॉडेल्सकडून कंपनीला अपेक्षा आहेत. त्यामुळे SUV मार्केटमधील महिंद्राची स्पर्धा आणखी वाढताना दिसू शकते.