
Mahindra XEV 9e Sporteq Electric SUV Update (फोटो सौजन्य-AI एआय)
महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. महिंद्रा कंपनी आपल्या इलेक्ट्रिक SUV मध्ये नवीन व्हेरिएंट्स, आकर्षक रंग आणि अपडेटेड फीचर्स देण्याच्या तयारीत आहे. Mahindra XEV 9e Sporteq Series च्या माध्यमातून कंपनी इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमधील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. याआधी कंपनीने ऑगस्टमध्ये BE 6 Sporteq Series सादर केली होती. त्याच धर्तीवर XEV 9e मध्येही अनेक बदल पाहायला मिळू शकतात.
नवीन बॅटरी पॅकचा मिळू शकतो ऑप्शन
सध्या महिंद्रा XEV 9e मध्ये 59 kWh आणि 79 kWh बॅटरी पॅकचे ऑप्शन मिळतात. आता या दोन्हीच्या मध्ये 70 kWh बॅटरी पॅक सादर केला जाण्याची शक्यता आहे. छोट्या बॅटरी पॅकसोबत 170 kW मोटर, तर 79 kWh बॅटरीसोबत 210 kW मोटर मिळते. दोन्ही व्हर्जनमध्ये 380 Nm टॉर्क मिळतो. 79 kWh व्हर्जनला 0 ते 100 kmph वेग गाठण्यासाठी केवळ 6.8 सेकंद लागतात. नवीन 70 kWh बॅटरीमुळे कस्टमर्सना रेंज आणि किंमतीनुसार जास्त एक ऑप्शन मिळू शकतो.
महिंद्रा रेसिंग आणि व्हॅलिओची भागीदारी; Formula E Gen4 कारसाठी मिळणार मोठी टेक्नोलॉजी मदत!
डिझाइन आणि इंटिरियरमध्येही बदल
महिंद्रा XEV 9e ची लांबी 4,789 mm, रुंदी 1,907 mm आणि उंची 1,694 mm आहे. या SUV चा व्हीलबेस 2,775 mm आहे. Sporteq Series मध्ये नवीन अलॉय व्हील्स, आकर्षक बॉडी कलर्स आणि बाह्य डिझाइनमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. सध्याच्या मॉडेलमध्ये 663 लिटरची बूट स्पेस आणि 150 लिटरचा फ्रंट स्टोरेज कंपार्टमेंट मिळतो.
केबिनमध्ये तीन डिजिटल स्क्रीनचे डॅशबोर्ड कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय 16-स्पीकर हार्मन कार्डन साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑगमेंटेड रिॲलिटी हेड-अप डिस्प्ले आणि इलेक्ट्रिक टेलगेट फीचर्स मिळतात.
नवीन सॉफ्टवेअर फीचर्सची भर
BE 6 Sporteq मध्ये देण्यात आलेले MAIA आधारित सॉफ्टवेअर XEV 9e मध्येही मिळू शकते. यामध्ये AI व्हॉइस असिस्टंट, कराओके, Drift Mode, डिजिटल की, व्हेईकल सर्व्हेलन्स आणि वैयक्तिक मेसेज डिस्प्ले यांसारख्या सुविधा असू शकतात. Rosso Impulso, Ruby Velvet, Graphite Storm आणि Firestorm Orange Satin हे नवीन कलरही मिळण्याची शक्यता आहे.
सध्या महिंद्रा XEV 9e ची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होते. Sporteq Series मध्ये नवीन फीचर्स आणि बॅटरी ऑप्शन मिळाल्यास किमतीतही बदल होऊ शकतो. कंपनीकडून लॉन्चची निश्चित तारीख आणि किंमतीची घोषणा होणे बाकी आहे.
Ans: ही इलेक्ट्रिक SUV लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. पण कंपनीने अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.
Ans: सध्याच्या 59 kWh आणि 79 kWh बॅटरी पॅकच्या मध्ये 70 kWh बॅटरी पॅकचा नवीन ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.
Ans: महिंद्रा XEV 9e ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन Sporteq Series मध्ये फीचर्स आणि व्हेरिएंट्सनुसार किंमतीत बदल होऊ शकतो.